IND vs SA: अरे, बुमराहला मध्येच काय झालं? अश्विन समोर असतानाच… पाहा VIDEO
जसप्रीत बुमराह भारताचा मुख्य गोलंदाज आहे. परदेशातील सर्वच दौऱ्यांमध्ये त्याने भन्नाट कामगिरी केली आहे. त्यामुळेच भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकला आल्या आहेत.
जोहान्सबर्ग: भारताचा अव्व्ल क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) गोलंदाजी बरोबरच नक्कल करण्यामध्येही मास्टर आहे. आयपीएल 2020 मध्ये सर्वप्रथम बुमराहचं हे नक्कल करण्याचं कौशल्य दिसून आलं होतं. त्यावेळी बुमराहने मुंबई इंडियन्सच्या नेटमध्ये महान क्रिकेटपटूंच्या सहा वेगवेगळ्या बॉलिंग अॅक्शनमध्ये गोलंदाजी करुन दाखवली होती. अलीकडेच टी-20 वर्ल्डकप नंतरच्या ट्रेनिंग सेशनमध्ये त्याने रविंद्र जाडेजाच्या अॅक्शनमध्ये गोलंदाजी करुन दाखवली होती. (India vs South Africa Bumrah impersonation of Ashwin Bowling action at johannesburg Wanderers Stadium)
अश्विनलाही आश्चर्य वाटलं आज जोहान्सबर्गच्या वाँडर्स स्टेडियमवर दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी बुमराह रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीची अॅक्शन करताना दिसला. भारतीय संघाचा सराव सुरु असतानाही बुमराहने अशी अॅक्शन दाखवली होती.
आज संघ मैदानावर उतरत असताना बुमराहने अचानक अश्विनच्या अॅक्शनमध्ये गोलंदाजी करत होता. अश्विन त्यावेळी बुमराहच्या समोर उभा होता. अश्विन ज्या पद्धतीने बॉलिंग करतो, बुमराहने सुद्धा तशीच अॅक्शन दाखवली. बुमराहने आज काही वेळा अश्विनची गोलंदाजीची शैली दाखवली. त्यावेळी समोर उभ्या असलेल्या अश्विनलाही आश्चर्य वाटलं.
Make Bumrah bowl off-spin and SA won’t realise that it’s not Ashwin they’re facing #INDvSA pic.twitter.com/NnYY8jP9oU
— Benaam Baadshah (@BenaamBaadshah4) January 4, 2022
जसप्रीत बुमराह भारताचा मुख्य गोलंदाज आहे. परदेशातील सर्वच दौऱ्यांमध्ये त्याने भन्नाट कामगिरी केली आहे. त्यामुळेच भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकला आल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या जोहान्सबर्ग कसोटीत भारताची सर्व मदार गोलंदाजांवर आहे. कारण 202 इतक्या कमी धावसंख्येत भारताचा पहिला डाव आटोपला आहे.
संबंधित बातम्या:
VIDEO: उत्तर प्रदेशात ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ मॅरेथॉनमध्ये चेंगराचेंगरी, किंचाळ्या आणि गोंधळ; सुदैवाने मोठी हानी टळली कोण आहेत प्रदीप कंद ज्यांच्या विजयानं अजित पवारांना ‘वाईट’ वाटलं?; भाजपनं पुणे बँक निवडणुकीत खातं कसं उघडलं? भगव्याला दैवत मानलं, भगव्यालाच कवटाळून गळफास, उस्मानाबादेत कट्टर शिवनसैनिकाची आत्महत्या! काय घडलं??
(India vs South Africa Bumrah impersonation of Ashwin Bowling action at johannesburg Wanderers Stadium)