IND vs SA: केपटाऊनमध्ये सरस कोण? भारत की दक्षिण आफ्रिका, आज ठरणार
भारताकडे मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर हे वर्ल्ड क्लास गोलंदाज आहेत. मोहम्मद सिराजच्या जागी संघात आलेला उमेश यादवही तितकाच घातक आहे.
डरबन: केपटाऊन कसोटीचा (cape town test) आजचा दुसरा दिवस महत्त्वाचा आहे. काल पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव 223 धावांवर संपुष्टात आला, तर दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) एक बाद 17 धावा झाल्या आहेत. भारताला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखल्यामुळे पहिल्या दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेचा संघ थोडा वरचढ ठरला. पण कसोटीचं पारडं दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकलं, असं म्हणता येणार नाही. आज कुठला संघ सरस कामगिरी करतो, त्यावर कसोटीची दिशा ठरेल व कुठला संघ मालिका जिंकू शकतो, त्याचा अंदाज बाधता येईल. सध्यातरी दोन्ही संघांना समान संधी दिसत आहे.
भारताकडे मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर हे वर्ल्ड क्लास गोलंदाज आहेत. मोहम्मद सिराजच्या जागी संघात आलेला उमेश यादवही तितकाच घातक आहे. गोलंदाजीमध्ये भारताची बेंच स्ट्रेथ मजबूत आहे. त्यामुळे 223 धावसंख्या कमी वाटत असली, तरी गोलंदाजीला अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला तडाखा देऊ शकतात. काल जसप्रीत बुमराहने जोहान्सबर्ग कसोटीचा नायक दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गरला बाद करुन त्याची चुणूक दाखवून दिली. फक्त दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी ज्या चूका केल्या, त्या टाळाव्या लागतील.
जोहान्सबर्ग कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 227 धावांवर रोखले पण दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने तीन विकेटच्या मोबदल्यात 240 धावांचे लक्ष्य सहज पार केले होते. त्या चूका भारतीय गोलंदाजांना केपटाऊनमध्ये टाळाव्या लागतील. कारण केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेने मोठी आघाडी घेतली, तर कसोटीत कमबॅक करणं, टीम इंडियाला कठीण होऊन बसेल.
न्यूलँडस स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी याचाच फायदा उचलला व भारताला कमी धावसंख्येवर रोखले. अपवाद फक्त कॅप्टन विराट कोहलीचा. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर झुंजार (79) धावांची खेळी केली. आज दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज विराटसारखी खेळी करणार नाही, हे भारतीय गोलंदाजांना सुनिश्चित करावे लागेल.
संबंधित बातम्या:
Virat Kohli: well-done कॅप्टन! आग ओकणाऱ्या चेंडूंसमोर दिसला ‘विराट’ निर्धार IND vs SA: विराट बाद झाला म्हणून आफ्रिकेच्या खेळाडुंनी मैदानात जल्लोष सुरु केला आणि तितक्यात… IND vs SA: मागच्या वर्षभरापासून अजिंक्य रहाणेच्या पायात काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय – गौतम गंभीर