IND VS SA: विराटाच्या शॉट सिलेक्शनवर गावस्करांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले….

विराट कोहली एक मोठा खेळाडू आहे. मोठे खेळाडू चुका दुरुस्त करुन पुनरावृत्ती टाळतात. पण विराट कोहलीला मात्र हे जमत नाहीय. मागच्या तीन वर्षात विराट कोहली 11 वेळा ड्राइव्ह मारताना आऊट झालाय.

IND VS SA: विराटाच्या शॉट सिलेक्शनवर गावस्करांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले....
virat kohli
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 8:08 PM

सेंच्युरियन: विराट कोहलीला भारताचं रन मशीन म्हटलं जातं. मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला विराट तंत्राच्या बाबतीतही तितकाच परफेक्ट आहे. पण सध्या धावाच विराटच्या बॅटवर रुसल्या आहेत की, काय असा प्रश्न पडतो. सेंच्युरियनवर आज संघाला गरज असताना विराटने स्वस्तात बाद झाला. खरंतर क्रिकेटच्या जाणकारांच्या मते विराटने आपली विकेट बहाल केली. ज्या पद्धतीने आणि ज्या चेंडूवर तो बाद झाला, त्यानंतर विराटला स्वत:ला सुद्धा आपल्या चेहऱ्यावरची निराशा लपवता आली नाही. (India vs South Africa Centurion Test Sunil Gavaskar questioned Virat Kohli’s shot-selection)

चौथ्या दिवशी लंचनंतरच्या मार्को जॅनसेनच्या पहिल्याच चेंडूवर, विराट बाद झाला. खरंतर हा चेंडू ऑफ स्टंम्पच्या बाहेर होता. विराटने संयम राखला असता, तरी काही नुकसान नव्हतं. पण विराटला ड्राइव्ह खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि तिथेच घात झाला. जॅनसेनच्या ऑफ स्टंम्प बाहेरच्या चेंडूवर ड्राइव्ह मारण्याच्य नादात चेंडूने बॅटची कड घेतली व विकेटकिपरच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन विसावला. विराट 18 धावांवर खिन्न मनाने पॅव्हेलियनमध्ये परतला.

विराट एकच चूक सारखी करतोय

विराट कोहली एक मोठा खेळाडू आहे. मोठे खेळाडू चुका दुरुस्त करुन पुनरावृत्ती टाळतात. पण विराट कोहलीला मात्र हे जमत नाहीय. मागच्या तीन वर्षात विराट कोहली 11 वेळा ड्राइव्ह मारताना आऊट झालाय. विराट कोहलीकडून ही अपेक्षा नाहीय. पहिल्या डावातही लुंगी निगीडीच्या गोलंदाजीवर विराट अशाच पद्धतीने बाद झाला होता. संघाला गरज असताना विराटने चूक केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला वरचढ होण्याची संधी मिळाली.

सुनील गावस्कर म्हणाले…. सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केला आहे. “लंच ब्रेकनंतर खेळपट्टीवर स्वत:ला स्थिरावण्याची संधी देण्याऐवजी कर्णधार वाईड चेंडूचा पाठलाग करतोय, हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला”

“लंच नंतर कोहलीने खेळलेला तो खराब फटका होता. ब्रेक नंतर प्रत्येक फलंदाजाने स्वत:ला वेळ दिला पाहिजे. कोहली एक अनुभवी फलंदाज आहे. कदाचित त्याच्या मनात डाव घोषित करण्याचा विचार सुरु असेल” असे गावस्कर म्हणाले. सेंच्युरियनच्या दोन्ही डावात विराट अपयशी ठरला. या वर्षात कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नाही. करीअरमध्ये पहिल्यांदाच लागोपाठ दोन वर्षात विराटच्या नावावर एकही शतक नाहीय.

संबंधित बातम्या:

मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही; नारायण राणेंचे कणकवली पोलिसांना पत्रातून उत्तर आता परीक्षेच्या आदल्यादिवशीही प्रवेश अर्ज करा, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली काय? वाचा सविस्तर पोलीस महासंचालक सिंधुदुर्गात काय करतात?, मग नारायण राणे तरी कोर्टात काय करतात?; वकिलांची जुगलबंदी रंगली

(India vs South Africa Centurion Test Sunil Gavaskar questioned Virat Kohli’s shot-selection)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.