कसोटीचा निकाल आज लागणार पण कोणाच्या बाजूने? भारतीय बॉलर्स ‘तो’ खतरनाक स्पेल टाकतील?

विजयासाठी त्यांना 122 धावा हव्या आहेत. आठ विकेट शिल्लक आहे. त्यांच पारडं जड वाटत आहे. पण कसोटी सामन्यात एका खतरनाक स्पेलमध्ये काहीही घडू शकतं.

कसोटीचा निकाल आज लागणार पण कोणाच्या बाजूने? भारतीय बॉलर्स 'तो' खतरनाक स्पेल टाकतील?
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 8:30 AM

जोहान्सबर्ग: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेला जोहान्सबर्ग कसोटी (Johannesburg Test) सामना रोमांचक झाला आहे. ही कसोटी एका रंगतदार वळणावर आहे. आज कसोटी निकाली निघणार हे निश्चित. पण निकाल कोणाच्या बाजूने लागणार? याची उत्सुक्ता आहे. मागची 29 वर्ष दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत भारतीय संघाला जे करुन दाखवणं शक्य झालं नाही, ते केएल राहुलचा भारतीय संघ करुन दाखवेल का? नवीन इतिहास रचेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळतील. (India vs South Africa johannesburg wanderers stadium Will indian bowlers make sure Indias Win)

भारतीय गोलंदाजी उजवी

या कसोटी मालिकेला सुरुवात झाल्यापासून भारतीय गोलंदाजी उजवी ठरली आहे. संघाला गरज असताना, भारतीय गोलंदाजांनी विकेट मिळवून दिल्या आहेत. त्यामुळेच सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवता आला व आज मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. आज जोहान्सबर्गमध्ये जिंकायचं असेल, तर भारतीय गोलंदाजांना आपलं सर्वोत्तम प्रदर्शन करावं लागेल.

बुमराह, शामी, सिराज आणि ठाकूरमुळे हे शक्य झालं

आज जगभरात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज शार्दुल ठाकूर आणि रविचंद्रन अश्विन यांची चर्चा आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या 20 विकेट काढण्याची कुवत या गोलंदाजांमध्ये आहे. वर्ल्ड क्लास गोलंदाजांमध्ये यांचा समावेश होतो. याच गोलंदाजीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये मालिका जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये कसोटी विजयाचा विचारही कोणी केला नसता, पण बुमराह, शामी, सिराज आणि ठाकूरमुळे हे शक्य झालं.

दक्षिण आफ्रिकेला नेस्तनाबूत करेल का?

आज वाँडर्सच्या खेळपट्टीवर ही चौकडी दक्षिण आफ्रिकेला नेस्तनाबूत करेल का? काल चौथ्या दिवसाच्या खेळावर दक्षिण आफ्रिकेने राज्य केल. दिवसअखेर त्यांच्या दोन बाद 118 धावा झाल्या आहेत. ते सुस्थितीत आहेत, हे खरं आहे. विजयासाठी त्यांना 122 धावा हव्या आहेत. आठ विकेट शिल्लक आहे. त्यांच पारडं जड वाटत आहे. पण कसोटी सामन्यात एका खतरनाक स्पेलमध्ये काहीही घडू शकतं. दक्षिण आफ्रिकेतल्या खेळपट्टया या गोलंदाजीला अनुकूल आहेत. आज फक्त भारतीय गोलंदाजांना एक दहाक स्पेल टाकून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून द्यायचा आहे. हे शक्य होणार की, नाही या प्रश्नाचं उत्तर आज मिळेलच. ALL THE BEST टीम इंडिया.

संबंधित बातम्या:

सुरतमध्ये टँकरमधून गॅस गळती, चार कामगारांचा गुदमरुन मृत्यू, 25 जण गंभीर Savita Malpekar : चोरीला गेलेली सोनसाखळी मिळाली, चोरट्याला बेड्या, अभिनेत्री सविता मालपेकर यांच्याकडून पोलिसांचे आभार आता खरीप हंगामातही घेता येणार हरभरा अन् राजमाचे उत्पादन, काय आहेत फायदे ?

(India vs South Africa johannesburg wanderers stadium Will indian bowlers make sure Indias Win)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.