IND vs SA : धवन-विराट बाद झाल्यावर आमचा डाव गडगडला, कप्तान राहुलकडून पराभवाचं खापर मधल्या फळीवर
कसोटी मालिकेपाठोपाठ वनडे सीरीजमध्येही (IND vs SA One Day Series) भारताचं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निराशाजनक प्रदर्शन सुरुच आहे. बुधवारी उभय संघांमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 31 धावांनी पराभव केला.
पार्ल : कसोटी मालिकेपाठोपाठ वनडे सीरीजमध्येही (IND vs SA One Day Series) भारताचं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निराशाजनक प्रदर्शन सुरुच आहे. बुधवारी उभय संघांमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 31 धावांनी पराभव केला. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शिखर धवनच्या (Shikhar dhawan) 79 धावा, विराट कोहलीची (Virat kohli) अर्धशतकी खेळी आणि शार्दुल ठाकूर नाबाद (50) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी जबाबदारीने खेळ केला नाही. त्यामुळे भारताचा पराभव झाला. भारताने 50 षटकात आठ बाद 265 धावा केल्या. शार्दुलने अखेरच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. भारताची मधली फळी ढासळल्याने भारताला पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान, पार्लमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेतील पराभवासह भारतीय कर्णधार केएल राहुलने पराभवाचं खापर मधल्या फळीवर फोडलं आहे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये केएल राहुल म्हणाला, “हा सामना खूप काही शिकण्यासारखा होता. यामध्ये आम्ही चांगली सुरुवात केली. पण आम्ही मधल्या षटकात विकेट्स गमावत राहिलो, त्यामुळे सामना आमच्या हातातून निसटला. मधल्या षटकात विकेट्स गमावणे टाळावे लागेल. तरच आम्ही समोरच्या संघाला रोखू शकतो.”
खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती : राहुल
पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या विकेटवर (खेळपट्टी) बोलताना केएल राहुल म्हणाला, “मी 20 षटकांच्या पुढे फलंदाजी केली नाही. पण त्यात फारसा बदल झाला आहे असे वाटत नाही. जेव्हा मी धवन आणि विराटशी विकेटबद्दल बोललो तेव्हा त्यांनी ती अधिक चांगली असल्याचे सांगितले. तो म्हणाला की खेळपट्टीवर थोडा वेळ घालवल्यानंतर फलंदाजी करणे सोपे होते. दुर्दैवाने त्यांच्यातील भागीदारी केवळ 92 धावांचीच होऊ शकली.
राहुल म्हणाला की, “दक्षिण आफ्रिकेने चांगली फलंदाजी केली. त्याने आमच्या गोलंदाजांवर सतत दबाव ठेवला. मधल्या षटकात आम्ही विकेट घेण्यात अयशस्वी झालो, त्यामुळे त्यांना 290 पेक्षा जास्त धावा करता आल्या. याशिवाय आमच्या बाजूने विराट-धवनव्यतिरिक्त मोठी भागीदारी होऊ शकली नाही.”
That’s that from the 1st ODI.
South Africa win by 31 runs.
Scorecard – https://t.co/PJ4gV8SFQb #SAvIND pic.twitter.com/NrRNxZgMNK
— BCCI (@BCCI) January 19, 2022
भारताची मधळी फळी कमकुवत
46 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर पुढे शिखऱ धवन आणि विराट कोहलीने डाव सावरला, दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 92 धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर भारताचा डाव गडगडला. धावफलकावर 138 धावा असताना शिखर धवन बाद झाला. डावखुरा गोलंदाज केशव महाराजचा चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळला आणि धवन क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर विराटही खेळपट्टीवर फार वेळ टिकला नाही. (51) धावांवर शम्सीच्या गोलंदाजीवर त्याने बावुमाकडे झेल दिला. हे दोघे बाद झाल्यानंतर ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि पदार्पण करणाऱ्या वेंकटेशन अय्यरकडून खूप अपेक्षा होत्या. पण तिघेही स्वस्तात बाद झाले. खरंतर या युवा खेळाडूंना काहीतरी करुन दाखवण्याची चांगली संधी होती, ती त्यांनी गमावली. अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूरन 43 धावांत 50 धावा फटकावल्या आणि तो नाबाद राहिला, मात्र तोवर सामना हातून निसटला होता.
RAMPAGING RASSIE?
Rassie van der Dussen follows his captain’s lead and rockets to a half-century off 83 balls? #SAvIND #BetwayODISeries #BePartOfIt | @Betway_India pic.twitter.com/HR8PJRcumh
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 19, 2022
इतर बातम्या
U19 World Cup: भारताचा आयर्लंडवर मोठा विजय, 12 चेंडूत 48 धावा तडकावणारा हरनूर ठरला हिरो
IND vs SA 1st ODI: ‘या’ तीन चुकांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव
(India vs South Africa, KL Rahul blames middle-order for losing first ODI)