AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs South Africa LIVE Score, 1st Test, DAY 1: पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका एक बाद 35

वाँडर्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी असल्यामुळे शार्दुल ठाकूरच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश केला जाईल, असे बोलले जात होते. पण विराट कोहली वगळता विजयी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

India vs South Africa LIVE Score, 1st Test, DAY 1: पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका एक बाद 35
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 9:27 PM
Share

डरबन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये  जोहान्सबर्गमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या एक बाद 35 धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 167 धावांनी पिछाडीवर आहे. टीमचा कॅप्टन डीन एल्गर नाबाद (11) आणि किगन पीटरसन नाबाद (14) धावांवर खेळत आहे. उद्या ते डावाला पुढे सुरुवात करतील. त्याआधी भारताचा पहिला डाव अवघ्या 202 धावांमध्ये आटोपला. बदली कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 50 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा युवा गोलंदाज मार्को जेनसॅनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या कसोटीआधी भारताला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या कसोटीत खेळत नाहीय. पाठीच्या दुखण्यामुळे त्याने सामन्यातून माघार घेतली आहे. विराटच्या जागी उपकर्णधार लोकेश राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विराटच्या जागी हुनमा विहारीला संघात स्थान देण्यात आले आहे. (india vs south africa live score today 2st test match day 1 scorecard johannesburg Wanderers Stadium)

वाँडर्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी असल्यामुळे शार्दुल ठाकूरच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश केला जाईल, असे बोलले जात होते. पण विराट कोहली वगळता विजयी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. वाँडर्समध्ये सामना जिंकल्यास भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास घडवेल. वाँडर्सच्या मैदानाने आतापर्यंत नेहमीच भारताला साथ दिली आहे.

भारतीय संघ: केएल राहुल(कर्णधार), हनुमा विहारी, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, आर अश्विन

दक्षिण आफ्रिकेचा संघ: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पीटरसन, टेंबा बावुमा, रेसी वान डर डुसें, कार्ल वेरेन, कगिसो रबाडा, मार्को जॅनसेन, लुंगी निगीडी, डुआन ओलिवर, केशव महाराज.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.