Marco Jansen| रोहितच्या मित्रानेच घेतली विराटची विकेट, 3 वर्षापूर्वीही केलं होतं हैराण

आज त्याच जॅनसेनने विराटची विकेट काढली. चौथ्यादिवशी लंचनंतर लगेच विराट आऊट झाला. त्याने जॅनसेनच्या गोलंदाजीवर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अंदाज चुकला.

Marco Jansen| रोहितच्या मित्रानेच घेतली विराटची विकेट, 3 वर्षापूर्वीही केलं होतं हैराण
Virat Kohli
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 5:24 PM

जोहान्सबर्ग: सेंच्युरियन कसोटीच्या दुसऱ्याडावात मार्को जॅनसेनने विराट कोहलीची विकेट काढली. विराट सारख्या वर्ल्ड क्लास फलंदाजाला बाद केल्यानंतर कुठल्याही गोलंदाजाला एक वेगळ समाधान मिळतं. सेंच्युरियन कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा डाव अडचणीत असताना विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण जॅनसेनने विराट सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करुन भारताचा डाव आणखी अडचणीत आणला. (India vs South Africa Second Test virat kohli wicket taken by Marco Jansen)

नेट बॉलर होता

हा तोच मार्को जॅनसेन आहे, ज्याने 2018 मध्ये भारत दौऱ्यात नेट बॉलर म्हणून विराट कोहलीला गोलंदाजी केली होती. त्यावेळी तो 17 वर्षांचा होता. जॅनसेनने तेव्हा, विराट कोहलीला अनेकदा चकवले सुद्धा होते. वाँडर्सच्या मैदानावर विराट नेट प्रॅक्टीस करत होता. मार्को जॅनसेन नेट बॉलर म्हणून विराटला गोलंदाजी करत होता. यावेळी जॅनसेनने एकदा नाही, तर तीनदा विराटला बीट केले होते. विराटने त्यावेळी वेल बॉल म्हणून जॅनसेनचे कौतुकही केले होते.

आज त्याच जॅनसेनने विराटची विकेट काढली. चौथ्यादिवशी लंचनंतर लगेच विराट आऊट झाला. त्याने जॅनसेनच्या गोलंदाजीवर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अंदाज चुकला. चेंडू बॅटची कड घेऊन थेट विकेटकिपर क्विंटन डि कॉकच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. जॅनसेनने विराटला बाद केल्याचं जोरदार आनंद सुद्धा व्यक्त केला. विराटने फक्त 18 धावा केल्या.

मार्को जॅनसेन रोहित शर्माचा मित्र मार्को जॅनसेन बरोबर रोहित शर्माची जुनी मैत्री आहे. आयपीएलमध्ये मार्को जॅनसेन मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. मुंबईने 20 लाख रुपयांमध्ये जॅनसेनला खरेदी केले होते. मुंबईकडून एकत्र खेळताना रोहित आणि जॅनसेनची मैत्री झाली.

मार्को जॅनसेन किती घातक? मार्को जॅनसेन एक ऑलराऊडर क्रिकेटर आहे. वयाच्या 9 व्या वर्षी त्याने टी-20 सामन्यात थेट 164 धावा फटकावल्या होत्या. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने विराट कोहलीला सुद्धा चकवले होते.

संबंधित बातम्या:

आले मुख्यमंत्र्यांच्या मना, तिथे पेट्रोल स्वस्ताईचा जमाना, झारखंडमध्ये पेट्रोलचे दर 25 रुपयांनी घटवले, अटी लागू Coronavirus: नवीन वर्षाच्या कार्यक्रमांना ब्रेक, आतषबाजी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई; राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना काय? IND vs SA: ‘थर्ड अंपायर झोपलाय का?’ शार्दुल ठाकूर No-Ball वर आऊट का?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.