AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs South Africa : कसोटी मालिकेपूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला झटका, ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे संघाच्या बाहेर

भारताविरुद्ध 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिके(South Africa)च्या संघाला मोठा धक्का बसलाय. वेगवान गोलंदाज अनरिक नॉर्किया (Anrich Nortje) भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडलाय.

India vs South Africa : कसोटी मालिकेपूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला झटका, 'हा' खेळाडू दुखापतीमुळे संघाच्या बाहेर
दक्षिण आफ्रिका
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 6:14 PM
Share

मुंबई : भारताविरुद्ध 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिके(South Africa)च्या संघाला मोठा धक्का बसलाय. वेगवान गोलंदाज अनरिक नॉर्किया (Anrich Nortje) भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडलाय. टेस्ट टीममध्ये निवड होण्यापूर्वीच अनरिक नॉर्किया दुखापतीनं ग्रस्त होता, पण टेस्ट मॅचच्या आधी नॉर्किया दुखापतीतून सावरू शकला नाही, त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेच्या टीममधून बाहेर पडावं लागलंय.

त्याच्याजागी इतर कोणताही खेळाडू नाही अनरिक नॉर्किया हा दक्षिण आफ्रिकेच्या या संघाच्या गोलंदाजीतला महत्त्वाचा घटक आहे. कागिसो रबाडासोबत त्यानं दक्षिण आफ्रिकेला महत्त्वाच्या प्रसंगी यश मिळवून दिलंय. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय, की अनरिक नॉर्किया त्याच्या आधीच्या दुखापतीमुळे टीम इंडियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडलाय. कोविड-19मुळे नॉर्कियाच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूच्या नावाची घोषणा केली जाणार नाही.

पुण्यात भारताविरुद्ध केलेलं कसोटीत पदार्पण कोविड-19चा (Covid)नवा व्हेरिएन्ट ‘ओमिक्रॉन'(Omicron)चे दक्षिण आफ्रिकेत जास्त रुग्ण आहेत, त्यामुळे दोन्ही संघ एक मजबूत बायो-बबलमध्ये जगत आहेत. अनरिक नॉर्कियानं यावर्षी 5 कसोटी सामन्यात 25 विकेट घेतल्या आहेत. 28 वर्षीय नॉर्किया त्याच्या फिटनेसवरून बऱ्याच दिवसांपासून हैराण आहे. नॉर्कियानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी 12 कसोटी सामने खेळले असून त्यात त्यानं 47 विकेट घेतल्या आहेत. नोर्कियानं 2019मध्ये पुण्यात भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. अनरिक नॉर्कियाला त्याच्या फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सनं पुढील हंगामासाठी देखील कायम ठेवलं होतं.

Ravichandran Ashwin : ‘कुलदीप यादवच्या स्तुतीनं भारावलो, पण मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं’

Kidambi Srikanth BWF : श्रीकांतनं BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर गोपीचंद यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Gashimov Memorial Chess : विश्वनाथन आनंदनं शाखरियार मामेदयारोवचा पराभव करत साजरा केला स्पर्धेतला पहिला विजय

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.