IND VS SA: याला म्हणतात कॅप्टन, विराटने शमीमध्ये जोश भरला आणि त्यानंतर पुढच्या तीन चेंडूत मैदानात जे घडलं ते….

विराट कोहली (Virat Kohli) मैदानात असतो, तेव्हा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू नेहमी टेन्शनमध्ये असतात. मैदानात विराट फलंदाजीसाठी क्रीजवर असेल किंवा कॅप्टनशिप करत असेल प्रतिस्पर्धी संघ नेहमीच दबावाखाली असतो.

IND VS SA: याला म्हणतात कॅप्टन, विराटने शमीमध्ये जोश भरला आणि त्यानंतर पुढच्या तीन चेंडूत मैदानात जे घडलं ते....
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 8:34 PM

केपटाऊन: विराट कोहली (Virat Kohli) मैदानात असतो, तेव्हा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू नेहमी टेन्शनमध्ये असतात. मैदानात विराट फलंदाजीसाठी क्रीजवर असेल किंवा कॅप्टनशिप करत असेल प्रतिस्पर्धी संघ नेहमीच दबावाखाली असतो. आज केपटाऊन कसोटीच्या (Cape Town Test) दुसऱ्यादिवशी सुद्धा हेच दिसून आलं. दक्षिण आफ्रिकेचे टेंबा बावुमा आणि किगन पीटरसनची जोडी जमली होती. त्यांची 42 धावांची पार्टनरशिपसुद्धा झाली होती. त्यावेळी मोहम्मद शमीने (Mohammed Shami) ही जोडी फोडली. भले विकेट शमीने घेतला असेल, पण शमीला तशी गोलंदाजी करण्यासाठी प्रेरित केलं ते विराटनं.

टाळ्या वाजवा टी-ब्रेकच्या आधीच्या सत्रात विराटने सर्वच क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांमध्ये जोश निर्माण केला. विराटने तर डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडूंनाही टाळ्या वाजवायला सांगितल्या. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. टाळ्या वाजवत रहा असे विराटने खेळाडूंना सांगितलं.

मोहम्मद शमीची कमालीची गोलंदाजी विराट कोहलीने खेळाडूंमध्ये जसा जोश भरला, तशी गोलंदाजांच्या बॉलिंगलाही धार आली. 56 व्या षटकात शमीने एका सुदंर आऊटस्विंगरवर टेंबा बावुमाला बाद केले. बावुमाचा कॅच कॅप्टन कोहलीने घेतला. या कॅचसह विराटने कसोटी क्रिकेटमध्ये 100 कॅच पूर्ण केल्या. शमीने बावुमाच्या विकेटनंतर लगेचच विकेटकिपर फलंदाज काइल वेरेनेला पंतकरवी झेलबाद केले व सामन्यावर भारताला पकड मिळवून दिली. टी-ब्रेकच्या आधी जसप्रीत बुमराहने एका सुंदर इनस्विंगरवर मार्को जॅनसेनला बोल्ड करुन दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं.

दुसऱ्यादिवसाची भारताने शानदार सुरुवात केली होती. बुमराहने एडेन मार्करामचा विकेट घेतला. त्यानंतर उमेश यादवने केशव महाराजला क्लीन बोल्ड केले. डुसेंला सुद्धा उमेशनेच तंबुचा रस्ता दाखवला. दक्षिण आफ्रिकेकडून पीटरसनने झुंजार 72 धावांची खेळी केली.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.