IND VS SA : ‘अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवालला पहिल्या कसोटीत स्थान नाही, हनुमा विहारीला संधी’

न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर उभय संघांमध्ये कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळवल्या जाणार आहेत.

IND VS SA : 'अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवालला पहिल्या कसोटीत स्थान नाही, हनुमा विहारीला संधी'
Ajinkya Rahane
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 10:46 AM

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर उभय संघांमध्ये कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळवल्या जाणार आहेत. या दौऱ्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. टीम इंडियाचे सिलेक्टर्स मुंबईतच आहेत आणि इथूनच टीमला दक्षिण आफ्रिकेला जायचे आहे. या मालिकेपूर्वीचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अजिंक्य रहाणेची संघात निवड होणार का? त्याची निवड झाली तरी तो दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल का? या प्रश्नाचे उत्तर माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने दिले आहे. (India vs South africa : VVS Laxman says Shreyas Iyer should get chance Not Ajinkya Rahane)

व्हीव्हीएस लक्ष्मणने स्टार स्पोर्ट्सशी खास संवाद साधताना सांगितले की, त्याच्या मते अजिंक्य रहाणेला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नाही. रहाणेऐवजी श्रेयस अय्यरला संधी देण्याबाबत लक्ष्मणने चर्चा केली. व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला की, श्रेयस अय्यरने चमकदार कामगिरी केली आहे आणि टीम इंडियाने त्याला संधी दिली पाहिजे.

रहाणेच्या जागी अय्यर खेळणार!

व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला की, ‘मला वाटते की रहाणेने पहिला सामना खेळू नये. सातत्याने संधी देणे महत्त्वाचे असून श्रेयस अय्यरने पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पहिल्याच कसोटीत अय्यरने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. माझा त्याच्यावर विश्वास आहे आणि युवा फलंदाजाला तेच हवे असते.

व्हीव्हीएस लक्ष्मणने हनुमा विहारीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी देण्याबाबत चर्चा केला. हनुमा विहारीला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नाही, त्यानंतर निवड समितीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, परंतु या खेळाडूला दक्षिण आफ्रिका-ए दौऱ्यावर पाठवण्यात आले आहे, जिथे तो चांगली कामगिरी करत आहे. हनुमा विहारीला दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळू शकते, हे त्याच्या कामगिरीवरून स्पष्ट झाले आहे. लक्ष्मणच्या मते, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मयंक अग्रवाललाही संधी मिळणार नाही, कारण राहुल-रोहितची जागा निश्चित होणार आहे. पुजारा तिसऱ्या क्रमांकावर तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळेल.

इतर बातम्या

IND VS NZ : न्यूझीलंडला नमवलं, मात्र पुढील दौऱ्यात लागणार टीम इंडियाची खरी कसोटी!

Virat Kohli : ‘विराट’ शतकाची दोन वर्षांपासून प्रतीक्षाच! प्रश्न विचारताच म्हणाला…

रहाणेच्या फॉर्मबाबत विराटचं थेट उत्तर; ‘मी त्याला जज करु शकत नाही, त्याला परिस्थितीची जाणीव’

(India vs South africa : VVS Laxman says Shreyas Iyer should get chance Not Ajinkya Rahane)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.