IND vs SL 3rd ODI Live : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेची भारतावर मात, 3 विकेट्स, 48 चेंडू राखून विजय
India vs Sri Lanka 3rd ODI Live Score : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे.
India vs Srilanka : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आज श्रीलंकेने भारताचा पराभव केला. आधीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे मालिका आधीच भारताने खिशात घातली असली तर आजच्या सामन्यातील विजयाने श्रीलंकेच्या संघाला पुढील टी-20 मालिकेसाठी अधिक बळ मिळेल. आजच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 225 धावांपर्यंत मजल मारली होती. हे आव्हान श्रीलंकेच्या संघाने 7 फलंदाजांच्या बदल्यात आणि 48 चेंडू राखून पूर्ण केलं. पावसामुळे आजचा सामना 47-47 षटकांपर्यंत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
भारताने दिलेल्या 225 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी सुरुवातीच्या काही षटकांमध्येच सामना आपल्या बाजूने झुकवला होता. सलामीवीर अविश्का फर्नांडो (76) आणि भानुका राजपक्ष (65) या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी करत श्रीलंकेला सुस्थितीत नेऊन ठेवलं. त्यानंतरच्या फलंदाजांची पडझड झाली खरी, परंतु 7 विकेटच्या बदल्यात लंकेने 226 धावांचं आव्हान पूर्ण केलं. भारताकडून पदार्पण करणाऱ्या फिरकीपटू राहुल चाहरने 3, चेतन साकरीयाने 2, कृष्णप्पा गौथमने 1 आणि हार्दिक पंड्याने 1 बळी मिळवला.
(India vs Sri Lanka ODI Series 2021 Live Score today India tour of Sri Lanka 2021 3rd ODI match scorecard in marathi)
Key Events
श्रीलंकेविरुद्धच्या या तिसऱ्या सामन्यात नाणेफेक होण्यापूर्वीच भारतीय संघाने हे बदल केले होते. याचे कारण तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकल्याने मालिका भारताने जिंकली आहे. त्यामुळे नवे प्रयोग करण्यासाठी भारताने या 5 नवख्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये संजू सॅमसन आणि राहुल चहर या टी-20 मध्ये भारतीय संघातून खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. तर कृष्णप्पा गौथम, नितेश राणा आणि चेतन सकारिया या पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूंचाही समावेश आहे.
दुसऱ्या सामन्यातही उत्कृष्ठ सुरुवात करणारा सलामीवीर पृथ्वी शॉ अर्धशतकाला हुकला आहे. कर्णधार शिखर धवन 13 धावांवर बाद झाल्यानंतर संजू सॅमसनसोबत 100 धावांचा टप्पा पूर्ण करणारा पृथ्वी अर्धशतकाला 1 धाव शिल्लक असताना बाद झाला. तर संजू देखील 46 धावांवर बाद झाला.
LIVE Cricket Score & Updates
-
श्रीलंकेचा 6 वा फलंदाज माघारी, राहुल चाहरचा दुसरा बळी
फिरकीपटू राहुल चाहरला दुसरं यश मिळालं आहे. सलामीवीर अविश्का फर्नांडो 76 धावांवर बाद (श्रीलंका 215/6)
-
भारताला चौथं यश, चरीत असलंका 24 धावांवर बाद
भारताला आजच्या सामन्यातील चौथी विकेट मिळाली आहे. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर चरीत असलंका 24 धावांवर बाद. (श्रीलंका 194/4)
-
-
भारतीय गोलंदाजांना तिसरं यश, धनंजय डीसिल्वा 2 धावांवर बाद, चेतन साकरियाचा दुसरा बळी
भारतीय गोलंदाजांना आजच्या सामन्यात तिसरं यश मिळालं आहे. नवोदित गोलंदाज चेतन साकरियाने धनंजय डीसिल्वा याला अवघ्या 2 धावांवर बाद करत वैयक्तिक दुसरा बळी मिळवला आहे. (श्रीलंका 151/3)
-
श्रीलंकेला दुसरा झटका, भानुका राजपक्ष 65 धावांवर बाद
भानुका राजपक्ष (65) च्या रुपात भारताला दुसरं यश मिळालं आहे. कारकिर्दीतला पहिलाच सामना खेळणाऱ्या चेतन साकरियाने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला (श्रीलंका 144/2)
-
श्रीलंकेची विजयाच्या दिशेने वाटचाल, 24 षटकात 82 धावांची गरज
सलामीवीर अविश्का फर्नांडो (57) आणि भानुका राजपक्ष (65) या दोघांनी अर्धशतकं झळकावत श्रीलंकेला सुस्थितीत ठेवलं आहे. (श्रीलंका 143/1)
-
-
श्रीलंकेचं अर्धशतक
35 धावांवर पहिला फलंदाज माघारी परतत्यानंतर 9 षटकात लंकेच्या फलंदाजांनी धावफलकावर अर्धशतक झळकावलं आहे. (50/1)
-
भारताला पहिलं यश, मिनोद भानुका 7 धावांवर बाद
भारतीय गोलंदाजांना आजच्या सामन्यातलं पहिलं यश मिळालं आहे. श्रीलंकेचा सलामीवीर मिनोद भानुका 7 धावांवर बाद. कृष्णप्पा गौथमचा कारकिर्दीतला पहिला बळी (श्रीलंका 35/1)
-
श्रीलंकेची सावध सुरुवात
श्रीलंकेचे सलामीवीर अविश्का फर्नांडो आणि मिनोद भनुकाने सावध सुरुवात केली आहे. 4 षटकात दोन्ही फलंदाजांनी धावफलकावर 24 धावा झळकावल्या आहेत.
-
श्रीलंकेच्या डावाला सुरुवात, 47 षटकांमध्ये 226 धावांची आवश्यकता
226 धावांचं आव्हान घेऊन श्रीलंकेचे फलंदाज मैदानात उतरले आहेत. सलामीसाठी अविश्का फर्नांडो आणि मिनोद भनुका खेळपट्टीवर दाखल.
-
श्रीलंकेच्या गोलंदाजांची कमाल, अवघ्या 225 धावांत टीम इंडिया गारद
नवदीप सैनीच्या रुपात टीम इंडियाने आपली 10 वी विकेट गमावली आहे. अवघ्या 225 धावांत भारतीय संघ गारद झाला आहे. सैनीने 15 धावांचं योगदान दिलं.
-
टीम इंडियाचा 9 वा फलंदाज माघारी, राहुल चाहर 13 धावांवर बाद
टीम इंडियाने 9 वी विकेट गमावली आहे. राहुल चाहर 13 धावा करुन माघारी परतला. चामिका करुणारत्ने याने त्याला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. (भारत 225/9)
-
भारताला 8 वा झटका, नितीश राणा अवघ्या 7 धावांवर बाद
भारताने 8 वी विकेट गमावली आहे. पदार्पणाचा सामना खेळणारा नितीश राणा अवघ्या 7 धावांवर बाद झाला आहे. (भारत 198/8)
-
IND vs SL : सूर्यकुमार 40 धावांवर बाद
चांगल्या लयीत दिसत असलेला सूर्यकुमार यादवही 33 व्या ओव्हरमध्ये धनंजयाच्या फिरकीवर बाद झाला आहे. 40 धावा करुन सूर्या आऊट झाला आहे.
-
IND vs SL : हार्दीक पंड्या तंबूत परत
मनिष पांडे पाठोपाठ भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्याही बाद झाला आहे. 19 धावा करुन हार्दीक तंबूत परतला आहे.
-
IND vs SL : मनिष पांडे बाद
सामन्याला सुरुवात होताच काही मिनिटातंच भारताने चौथा विकेट गमावला आहे. मनिष पांडे 11 धावा करुन तंबूत परतला आहे.
3rd ODI. 24.5: WICKET! M Pandey (11) is out, c Minod Bhanuka b Praveen Jayawickrama, 157/4 https://t.co/7LRDbxifam #SLvIND
— BCCI (@BCCI) July 23, 2021
-
IND vs SL : सामन्याला पुन्हा सुरुवात
जवळपास दीड तास पावसामुळे थांबलेला सामना पुन्हा सुरु करण्यात आला आहे. दुष्मंत चमीरा 24 वी ओव्हर टाकत असून त्याच्या ओव्हरला सूर्यकुमारने दोन खणखणीत चौकार ठोकत भारतासाठी 150 धावांचा टप्पाही पार केला आहे.
-
IND vs SL : सामन्यातील ओव्हर्स केल्या कमी
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे थांबवण्यात आला होता. आता पाऊस थांबल्यामुळे सामना पुन्हा सुुर केला जाणार असून 6.30 सामन्याला सुरुवात होईल. सामन्यातील 1 तास वाया गेल्याने दोन्ही संघाच्या 3-3 ओव्हर्स कमी करण्यात आल्याने सामना 47 ओव्हर्सचाच होईल.
UPDATE: The rain takes a breather. ?
Play to resume at 18.30 (Local Time).
Number of overs: 4⃣7⃣ per side. #TeamIndia #SLvIND
Scorecard ? https://t.co/7LRDbx0DLM pic.twitter.com/sFiodKuEMd
— BCCI (@BCCI) July 23, 2021
-
IND vs SL : पाऊस थांबला, पण अजूनही सामना सुरु होण्यास काही वेळ शिल्लक
अचानक कोलंबोमध्ये जोरदार पाऊस सुरु झाल्यामुले सामना 23 ओव्हरनंतर थांबवण्यात आला. पण आता पाऊस बंद झाल्यामुळे सामना पुन्हा सुरु होऊ शकतो. मात्र मैदानावरील कव्हर्स अजून काढले नसल्याने सामना सुरु होण्यास काही वेळ शिल्लक आहे.
-
IND vs SL : संजू सॅमसन 46 धावा करुन बाद
भारताकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणारा संजू सॅमसन सलामीच्या सामन्यात अर्धशतकापासून केवळ 4 धावा दूर असताना बाद झाला आहे. 19 व्या ओव्हरमध्ये तो झेलबाद झाला आहे.
-
IND vs SL : पृथ्वी शॉ LBW
अर्धशतकापासून केवळ एक धाव दूर असताना भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ बाद झाला आहे. श्रीलंकेचा कर्णधार शनाकाने शॉला पायचीत केलं आहे.
-
IND vs SL : भारताच्या 50 धावा पूर्ण
एक विकेट गेल्यानंतर पृथ्वी आणि संजू यांनी संयमी फलंदाजी करत भारतासाठी 50 धावांचा आकडा पार केला आहे. सध्या क्रिजवर पृथ्वी शॉ आणि संजू सॅमसनची जोडी खेळत आहे.
-
IND vs SL : कर्णधार धवन बाद
भारताचा कर्णधार शिखरने एक चांगली सुरुवात केली होती. मात्र तिसऱ्याच ओव्हरध्ये चमिराच्या चेंडूवर यष्टीरक्षकाने त्याचा झेल पकडल्याने शिखर बाद झाला आहे.
3rd ODI. 2.3: WICKET! S Dhawan (13) is out, c Minod Bhanuka b Dushmantha Chameera, 28/1 https://t.co/7LRDbxifam #SLvIND
— BCCI (@BCCI) July 23, 2021
-
IND vs SL : धवनकडून चौक्यांची हॅट्रीक
भारताचा कर्णधार शिखर धवनने सामन्यातील दुसऱ्याच ओव्हरला धनंजया याच्या ओव्हरला पहिल्या तीन बॉलवर सलग तीन चौकार ठोकले आहेत.
-
IND vs SL : शॉ-धवन जोडी मैदानात
टॉस जिंकत भारताने फलंदाजीला सुरुवात केली आहे. सलामीला कर्णधार शिखर धवन आणि पृथ्वी शॉ मैदानात आले आहेत.
-
IND vs SL : श्रीलंका संघातही 3 बदल
श्रीलंका संघाने देखील त्यांच्या प्लेइंग इलेवनमध्ये 3 बदल केले आहेत. फिरकीपटू वानिंदु हसनरंगाला दुखापत झाली आहे.तर कसुन रजीता आणि स्पिनर लक्षन संदाकन ही संघाबाहेर आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी अकिला धनंजया, रमेश मेंडिस आणि प्रवीण जयविक्रमा यांना संधी देण्यात आली आहे.
Your ?? XI for the 3rd ODI vs India!#SLvIND pic.twitter.com/2168A62n4D
— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) July 23, 2021
-
IND vs SL : तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ
Hello & Good Afternoon from Colombo ☀️ ?#TeamIndia have elected to bat against Sri Lanka in the third & final ODI of the series. #SLvIND
Follow the match ? https://t.co/7LRDbx0DLM
Here is India’s Playing XI ? pic.twitter.com/pioejNJG5k
— BCCI (@BCCI) July 23, 2021
-
IND vs SL : भारताने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय
मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकत कर्णधार शिखरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात 6 बदल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 5 खेळाडूतर एकदिवसीय सामन्यात पदार्पण करत आहेत.
Say Hello ?? to our 5 ODI debutants #TeamIndia #SLvIND
Congratulations boys ???? pic.twitter.com/ouKYrtrW8G
— BCCI (@BCCI) July 23, 2021
-
भारतीय संघातून 5 खेळाडू करणार डेब्यू
नाणेफेक होण्यापूर्वीच भारतीय संघाने संघात मोठे बदल केले आहेत. तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकल्याने मालिका भारताने जिंकली आहे. त्यामुळे नवे प्रयोग करण्यासाठी भारताने 5 नवख्या खेळाडूंना संधी देत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली आहे. यामध्ये संजू सॅमसन आणि राहुल चहर या टी-20 मध्ये भारतीय संघातून खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. तर कृष्णप्पा गौथम, नितेश राणा आणि चेतन सकारिया या पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूंचाही समावेश आहे.
Published On - Jul 23,2021 2:33 PM