IND vs SL 1st T20 Live : श्रीलंकेचा संघ 126 धावांत गारद, भारताची लंकेवर 38 धावांनी मात
India vs Sri Lanka 1st T20 Live Score : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे.
India vs Srilanka : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. कोलोंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर उभय संघांमध्ये आज पहिला टी-20 सामना खेळवण्यात आला. आजच्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 38 धावांनी मात केली आहे. आधी सूर्यकुमार यादवचं अर्धशतक (50) आणि कर्णधार शिखर धवनच्या 46 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर 165 धावांचं आव्हान उभं केलं होतं. परंतु हे आव्हान श्रीलंकन फलंदाजांना पेलवलं नाही. कारण भुवनेश्वर कुमारसह (4 बळी) सर्वच गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना अवघ्या 126 धावांत रोखलं. त्यामुळे 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.
(India vs Sri Lanka T20 Series 2021 Live Score today India tour of Sri Lanka 2021 1st T20 match scorecard in marathi)
Key Events
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज चमिराने योग्य ठरवला. त्याने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर पृथ्वी शॉला (0) बाद केलं. त्यानंतर संजू सॅमसन (27) कर्णधार शिखर धवन (46) आणि सूर्यकुमार यादव (50) अर्धशतक लगावत भारताचा डाव सावरला. परंतु अखेरच्या षटकात खालच्या क्रमांकावरील फलंदाजांना चांगली फलंदाजी करता न आल्याने भारताला 164 धावांपर्यंतच मजल मारता आली.
165 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने सुरुवात चांगली केली होती. मात्र कृणाल पंड्याने मिनोद भानुका याला 10 धावांवर बाद करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. श्रीलंकेकडून सलामीवीर अविष्का फर्नांडो (26) आणि चरीत असालंका (44) या दोघांनी काही वेळ प्रतिकार केला, मात्र या दोघांव्यतिरिक्त श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 बळी मिळवले. तर दीपक चाहरने 2 बळी मिळवले. कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.
LIVE Cricket Score & Updates
-
श्रीलंकेचा 8 वा फलंदाज माघारी, कर्णधार दासून शनाका 16 धावांवर बाद
श्रीलंकेच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. वरुण चक्रवर्तीने कर्णधार दासून शनाका याला 16 धावांवर यष्टीचित केलं आहे. (श्रीलंका 125/8)
-
भारताला सहावं यश, वानिंदू हसरंगा शून्यावर बाद
16 व्या षटकात दीपक चाहरने आधी आक्रमक चरीत असालंका याला बाद केल्यानंतर मैदानात आलेल्या वानिंदू हसरंगा शून्यावर बाद केलं आहे. (श्रीलंका 11/5)
-
-
श्रीलंकेला पाचवा झटका, आक्रमक चरीत असालंका 44 धावांवर बाद
श्रीलंकेने पाचवी विकेट गमावली आहे. दीपक चाहरने आक्रमक चरीत असालंका याला 44 धावांवर बाद केलं. (श्रीलंका 11/5)
-
भारताला चौथं यश, अशेन बंडारा 9 धावांवर बाद
हार्दिंक पंड्याने भारताला चौथी विकेट मिळवून दिली आहे. त्याने अशेन बंडारा याला 9 धावांवर बाद केलं. (श्रीलंका 90/4)
-
श्रीलंकेला तिसरा झटका, अविष्का फर्नांडो 26 धावांवर बाद
श्रीलंकेने तिसरी विकेट गमावली आहे. भुवनेश्वर कुमारने सलामीवीर अविष्का फर्नांडोला 26 धावांवर बाद केलं. संजू सॅमसनने सोपा झेल घेत त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (श्रीलंका 50/3)
-
-
भारताला दुसरं यश, धनंजय डी सिल्वा 9 धावांवर बाद
फिरकीपटू युजवेंद्र चहलने भारताला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. त्याने धनंजय डी सिल्वा याला 9 धावांवर बाद केलं. (श्रीलंका 48/2)
-
श्रीलंकेला पहिला झटका, मिनोद भानुका 10 धावांवर बाद
फिरकीपटू कृणाल पंड्याने भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे. सलामीवीर मिनोद भानुकाला त्याने 10 धावांवर बाद केलं. (श्रीलंका 23/1)
-
श्रीलंकेच्या डावाला सुरुवात, दोन षटकांत 20 धावा
श्रीलंकेच्या डावाला सुरुवात झाली आहे. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी पहिल्या दोन षटकात 20 धावा फटकावल्या आहेत.
-
भारताचा पाचवा गडी माघारी, हार्दिक पंड्या 10 धावांवर बाद
भारताने पाचवी विकेट गमावली आहे. जलदगती गोलंदाज चमिराने हार्दिक पंड्याला 10 धावांवर विकेटकिपरकरवी झेलबाद केल. (154/5)
-
भारताला चौथा झटका, सूर्यकुमार यादव बाद
भारताला चौथा झटका, सूर्यकुमार यादव बाद, शिखर बाद झाल्यानंतर सूर्यकुमारकडून भारतीय चाहत्यांच्या आशा होत्या. पण काही धावांच्या फरकात तो देखील बाद झाला. सूर्यकुमारने 34 चेंडूत अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर तो झेलबाद झाला.
-
भारताला तिसरा झटका, शिखर बाद
भारताला तिसरा झटका, शिखर बाद, शिखरने 36 चेंडूत 46 धावा केल्या
-
धवन-सूर्यकुमारचा सावध खेळ, भारताचं शतक
कर्णधार शिखर धवन (40) आणि सूर्यकुमार यादव (30) या दोघांनी चांगली भागीदार रचत 11.5 षटकांमध्ये धावफलकावर शतक झळकावलं आहे.
-
शिखर धवनचा षटकार
भारतीय संघाची धावगती कमी झाली होती. त्यामुळे 12 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शिखर धवनने रिस्की शॉट लगावत षटकार वसूल केला. (भारत 94/2)
-
भारताला दुसरा झटका, संजू सॅमसन 27 धावांवर बाद
संजू सॅमसनच्या रुपात भारताने दुसरा गडी गमावला आहे. वानिंदू हसरंगाने त्याला 27 धावांवर बाद केलं. (भारत 51/2)
-
शिखर धवनने एकाच षटकात दोन चौकार
चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अखिला धनंजयाच्या गोलंदाजीवर शिखर धवनचे शानदार चौकार लगावला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर गब्बरने अजून एक चौकार लगावला (3.4 षटकात भारत 28/1)
-
पृथ्वी शॉ गोल्डन डकवर बाद होणारा दुसरा भारतीय फलंदाज
पृथ्वी शॉ टी – 20 डेब्यूच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तथापि, अशा प्रकारे टी-20 क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात बाद होणारा तो पहिला भारतीय खेळाडू नाही. त्याच्या अगोदर के. एल. राहुलदेखील अशा पद्धतीने बाद झाला होता.
Golden duck on T20I debut for India:
KL Rahul v Zim, Harare, 2016 Prithvi Shaw v SL, Colombo, 2021*#INDvSL #SLvIND
— Umang Pabari (@UPStatsman) July 25, 2021
-
भारताला पहिला झटका, पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉ बाद
सामन्यातील पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज चमिराने पृथ्वी शॉला बाद केलं आहे.
-
IND vs SL : प्लेईंग इलेव्हन
भारत : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती आणि युजवेंद्र चहल.
श्रीलंका : दसून शनाका (कर्णधार), अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (यष्टीरक्षक), अशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, चरित असालंका, चमिका करुणारत्ने, वानिंदू हसरंगा, इसुरु उडाना, दुष्मंता चामीरा आणि अकिला धनंजया.
-
नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात दोन नवे चेहरे
श्रीलंकेचा कर्णधार शनाका याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Sri Lanka choose to field first in the opening T20I.
Who are you backing?#SLvIND | https://t.co/LjwbAGMESN pic.twitter.com/qKTPhyetrm
— ICC (@ICC) July 25, 2021
Published On - Jul 25,2021 7:43 PM