IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्धच्या ODI सीरीजसाठी भारताची जोरदार तयारी, शाहरुख खानसह आणखी एक जण स्टँडबायवर

भारताने वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) आगामी वनडे मालिकेसाठी (One day series) आधीच संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने या संघामध्ये आणखी दोन खेळाडुंची नाव जोडली आहेत.

IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्धच्या ODI सीरीजसाठी भारताची जोरदार तयारी, शाहरुख खानसह आणखी एक जण स्टँडबायवर
shahrukh-sai kishore AFP Photo
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 11:13 AM

मुंबई: भारताने वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) आगामी वनडे मालिकेसाठी (One day series) आधीच संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने या संघामध्ये आणखी दोन खेळाडुंची नाव जोडली आहेत. सध्यातरी हे दोन्ही खेळाडू मुख्य संघाचा भाग नसतील. पण गरज पडल्यास त्या दोघांचा टीम इंडियामध्ये समावेश केला जाईल. BCCI ने सध्या या दोन्ही खेळाडूंना स्टँडबायवर ठेवलं आहे. शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि साई किशोर अशी बीसीसीआयने स्टँडबायवर ठेवलेल्या दोन खेळाडुंची नाव आहेत. आगमी वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी दोन खेळाडूंना स्टँडबायवर ठेवण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सीरीजवर कुठलाही परिणाम होऊ नये, यासाठी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिली.

शाहरुख खान फिनिशर शाहरुख खान तामिळनाडूचा मधल्याफळीतील फलंदाज आहे. सामना संपवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमध्ये शाहरुख खानने फिनिशरचा खेळ दाखवला आहे. त्याशिवाय फिरकी गोलंदाज साई किशोरलाही तयार ठेवण्यात आले आहे. या दोघांशिवाय तामिळनाडूच्याच वॉशिंग्टन सुंदरचा वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आधीच संघात समावेश करण्यात आला आहे.

तामिळनाडूच्या अडचणी वाढल्या या तीन खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाल्यामुळे तामिळनाडूला आपल्या रणजी संघासाठी तीन अन्य पर्याय शोधावे लागतील. रणजीमध्ये कसा संघ उतरवायचा, यासंबंधी पुढच्या दोन दिवसात निर्णय होईल. वनडे सीरीज संपल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर पुन्हा तामिळनाडूकडून खेळणार आहे.

टी.नटराजनला मिळू शकते संधी डावखुरा वेगवान गोलंदाज टी.नटराजनचा तामिळनाडूच्या रणजी संघात समावेश होऊ शकतो. पण त्याआधी त्याला फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. नटराजनच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे मागच्या दोन महिन्यांपासून तो संघाबाहेर आहे. त्याला टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. रणजी करंडक स्पर्धा 13 फेब्रुवारीपासून सुरु होईल. यामध्ये विजय शंकर तामिळनाडूचे नेतृत्व करेल.

6 फेब्रुवारीपासून वनडे सीरीज 6 फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये वनडे मालिकेला सुरुवात होईल. नऊ फेब्रुवारीला दुसरी आणि 11 फेब्रुवारीला तिसरा वनडे सामना होईल.

india vs west indies shahrukh khan sai kishore added as stand byes in indian squad

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.