संघात स्थान न मिळाल्याने आश्विन फलंदाजीच्या सरावात व्यस्त, PHOTO केला शेअर, फोटो पाहून फॅन्सना पडला मोठा प्रश्न

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. पण या सामन्यात भारताला फिरकीपूट आणि अष्चपैलू खेळाडू आर आश्विन हा खेळत नसल्याने तो सध्या सराव करण्यात व्यस्त आहे.

संघात स्थान न मिळाल्याने आश्विन फलंदाजीच्या सरावात व्यस्त, PHOTO केला शेअर, फोटो पाहून फॅन्सना पडला मोठा प्रश्न
आर आश्विन
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 6:49 PM

लंडन : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत अत्यंत अडचणीत सापडला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात तब्बल 354 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताची अवस्था बिकट झाली आहे. दरम्यान या कसोटीसाठी भारताने संघात कोणताच बदल केला नाही. लॉर्ड्सची कसोटी जिंकल्यामुळे भारताने कोणताच बदल केला नसावा असे म्हटले जात आहे. मात्र दिग्गज गोलंदाज आर आश्विनला (R Ashwin) संघात स्थान न मिळाल्याने अनेक चर्चांना उधान आलं होतं.

दुसरीकडे आश्विन मात्र सध्या आपल्या फलंदाजीवर काम करत आहे. जगातील सध्याच्या अव्वल फिरकीपटूमध्ये स्थान मिळवलेा आश्विन आता आपली बॅटिंगही सुधारु पाहत आहे. आश्विन त्यामुळे नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असून त्याने तसे फोटोही शेअर केले आहेत. पण या फोटोंमुळे आश्विनचे चाहते थोडे कन्फ्युज झाले असून त्यांना काही प्रश्न पडले आहेत.

आर अश्विनने शेअर केले सरावाचे फोटो

आर अश्विनने त्याच्या सोशल मीडियावर मैदानात सराव करतानाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये नेट्समध्ये फलंदाजीची प्रॅक्टिस करत आहे. त्याने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘दर दिवशी काहीतरी नवीन करण्याची आग (इच्छा) संपत नाही ’. दरम्यान आश्विनने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो डावखुरी फलंदाजी करताना दिसत आहे. सहसा उजव्या हाताने फलंदाजी करणारा आश्विन डावखुरी फलंदाजी का करत आहे? यामुळे फॅन्स कन्फ्युज झाले आहेत.

शिखरची मजेशीर कमेंट

आश्विनने शेअर केले्या फलंदाजीच्या फोटोजमधून तो बोलिंगप्रमाणे बॅटिंगमध्येही काही बदल करु इच्छित असल्याचं दिसून येत आहे. पण या फोटोवर भारतीय खेळाडू शिखर धवनने (Shikhar Dhawan) एक कमेट केली असून त्यात ‘भावा डाव्या हाताने फलंदाजी करताना तू भारी दिसतो आहेस.’ असं लिहिलं आहे आणि त्यापुढे हसण्याचा इमोजी टाकला आहे. दरम्यान मूळात हा फोटो एक मिरर सेल्फी असल्याने उजव्या हाताने फलंदाजी करणारा आश्विन डावखुरा दिसत असल्याचे नीट पाहिल्यावर समजते.

इतर बातम्या

IND vs ENG: 91 वर्षांपूर्वीचा ब्रॅडमन यांचा विक्रम तोडण्याच्या उंबरठ्यावर जो रुट, भारताविरुद्ध करणार ‘ही’ धमाकेदार कामगिरी

IND vs ENG : रोहितची एक चूक भारताला पडली महाग, तिसऱ्या कसोटीत मोठं नुकसान, पाहा VIDEO

विराट सातव्यांदा अँडरसनचा बळी, कोहलीला खेळताच येईना, गावसकर म्हणाले, आताच्या आता सचिनला कॉल कर!

(Indian all rounder Ravi Ashwin left handed batting pictures confuse fans on Social media)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.