‘प्यार का कोई धर्म नही होता…’ भारतीय खेळाडू शिवम दुबे मैत्रीण अंजुम खानशी विवाहबद्ध 

भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने धर्माच्या भिंती ओलांडत कट्टरतावाद्यांच्या मुस्कटात लावली आहे. त्याने आपली मुस्लिम मैत्रीण अंजुम खानशी लग्न केलंय. (Indian Cricket player Shivam dube Married his GirlFriend Anjum Khan)

'प्यार का कोई धर्म नही होता...' भारतीय खेळाडू शिवम दुबे मैत्रीण अंजुम खानशी विवाहबद्ध 
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने धर्माच्या भिंती ओलांडत कट्टरतावाद्यांच्या मुस्कटात लावली आहे. त्याने आपली मुस्लिम मैत्रीण अंजुम खानशी लग्न केलंय.
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 6:55 AM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने (Shivam Dube) धर्माच्या भिंती ओलांडत कट्टरतावाद्यांच्या मुस्कटात लावली आहे. त्याने आपली मुस्लिम मैत्रीण अंजुम खानशी (Anjum Khan) लग्न केलंय. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये हे जोडपं विवाहबद्ध झालंय. शिवमने त्याच्या ट्विटर हँडलवरुन लग्नाचे काही क्षण, क्षणचित्रे शेअर केले आहेत. चाहत्यांनी नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Indian Cricket player Shivam dube Married his GirlFriend Anjum Khan)

“आम्ही प्रेमावर प्रेम केलं…”

अनेक मॅचेसमध्ये महत्तवपूर्ण खेळी करणाऱ्या शुभमने आता आपल्या आयुष्यातील दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आहे. “आम्ही प्रेमावर प्रेम केलं… जे प्रेमापेक्षा जास्त होतं.. आता आमचं नवं आयुष्य सुरु होतं…. जस्ट मॅरिड 16-07-2021…!”, असं कॅप्शन देत शिवमने पत्नी अंजुमसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर

शिवमने शेअर केलेल्या फोटोंमध्ये नवदाम्पत्य फारच गोड दिसत आहे. एकूण तीन फोटो शिवमने शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये उभयतांनी कॅमेराकडे पाहून स्मितहास्य केलंय… दुसऱ्या फोटोत अंजुम खान दुवा मागताना दिसून येत आहे. तर तिसऱ्या फोटोत शिवम अंजुमच्या बोटात अंगठी घालत आहे…

लवकरच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

शिवम दुबे याआधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरु संघाचा हिस्सा होता. मात्र 2021 पासून तो राजस्थान रॉयल्स संघात खेळतो. आता काही महिन्यातच यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित मॅचेसमध्ये लग्नानंतर शिवम खेळताना दिसेल.

14 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व

शिवमने भारताकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला. त्याने 13 टी ट्वेन्टी आणि एका एकदिवसीय मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो शेवटच्या वेळी फेब्रुवारी 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

(Indian Cricket player Shivam dube Married his GirlFriend Anjum Khan)

हे ही वाचा :

‘प्यार का कोई धर्म नहीं होता…’ या भारतीय क्रिकेटपटूंनी झुगारली जातीधर्माची बंधनं!

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.