गौतम गंभीरने सूत्र घेताच पहिल्याच दौऱ्यात धक्का, 18 वर्षांनंतर टीम इंडियाचे असे हाल

gautam gambhir head coach: गौतम गंभीरच्या आगमनानंतर टीम इंडियाची कामगिरी खालावली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे एक दशकाहून अधिक काळ भारतीय संघाचे आधारस्तंभ राहिले आहे. परंतु श्रीलंका दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत भारतीय संघ विजय होऊ शकला नाही.

गौतम गंभीरने सूत्र घेताच पहिल्याच दौऱ्यात धक्का, 18 वर्षांनंतर टीम इंडियाचे असे हाल
gautam gambhir head coach
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 8:12 AM

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्र घेताच भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारत आणि श्रीलंके दरम्यान झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा लाजीरवाणा पराभव केला. श्रीलंका संघाने दिलेले 241 धावांचे आव्हान टीम इंडिया करु शकली नाही. भारताचा 32 धावांनी लंकेने पराभव केला. या विजयाबरोबर श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या दौऱ्यातील पहिला सामना टाय झाला होता. आता तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवशीय सामन्यात भारतीय संघाने दमदार कमगिरी केली तरी ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटणार आहे. दुसरीकडे श्रीलंकेकडे मालिका जिंकण्याची संधी आहे. गौतम गंभीर प्रशिक्षक होताच प्रथमच भारतीय संघाची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. भारतीय संघ 18 वर्षांनंतर मालिका जिंकू शकणार नाही.

18 वर्षात पहिल्यांदाच…

गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर हा केवळ सहावा सामना आहे. टीम इंडियाचे या दिवसांमध्ये दोन सामने बरोबरीत सुटले आहे. आता 18 वर्षात पहिल्यांदाच वाईट दिवस भारतीय संघाला आले आहे. गेल्या 18 वर्षांपासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका जिंकत आला आहे. 2006 नंतर आता प्रथमच श्रीलंकेविरुद्ध मालिका टीम इंडियाला जिंकता येणार नाही. यापूर्वी, राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका 0-0 अशी बरोबरीत संपली होती. त्यावेळी देखील टीम इंडिया 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी गेली होती, ज्यामध्ये पावसामुळे तिन्ही सामने रद्द करावे लागले होते. मात्र, यावेळी गंभीरच्या कारकिर्दीत भारत पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

दोन दिग्गज संघात असताना पराभव

गौतम गंभीरच्या आगमनानंतर टीम इंडियाची कामगिरी खालावली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे एक दशकाहून अधिक काळ भारतीय संघाचे आधारस्तंभ राहिले आहे. परंतु श्रीलंका दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत भारतीय संघ विजय होऊ शकला नाही. दोन्ही दिग्गज संघात असताना गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे.

हे सुद्धा वाचा

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.