भारतीय क्रिकेटर बनला थेट डीसीपी, सरकारने दिलेलं वचन केलं पूर्ण

भारतीय क्रिकेटरने आज तेलंगणा पोलिसात डीएसपी पदाचा पदभार स्वीकारला आहे. तेलंगणा पोलिसांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. पण नंतर ती हटवण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेटर बनला थेट डीसीपी, सरकारने दिलेलं वचन केलं पूर्ण
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 6:50 PM

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला शुक्रवारी तेलंगणा पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पद बहाल केले. सिराजने आज पदभार स्वीकारला. सिराज याने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. सिराजने अनेक सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याच्या योगदानामुळे त्याला हे पद देण्यात आले आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये देखील तो टीम इंडियाचा भाग होता. सिराजच्या कामगिरीचेही कौतुक झाले होते.

टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर सिराजला सरकारी नोकरी देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळेच मोहम्मद सिराज याला तेलंगणा पोलिसात डीएसपी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सिराजने आज पदाची जबाबदारीही स्वीकारली आहे. मात्र, याचा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर कोणताही परिणाम होणार नाही. सिराज टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे.

सिराजला घर बांधण्यासाठी जमीन

सिराजला नोकरीसह जमीन देण्याचे आश्वासनही सरकारने दिले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिराजला हैदराबादमध्ये घरा बांधण्यासाठी जमीनही देण्यात आली आहे. भारताच्या T20 विश्वचषकात तेलंगणचा सिराज एकमेव क्रिकेटर होता. तो भारतीय संघाचा भाग होता. सिराज अजूनही टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहे.

सिराजची दमदार कारकीर्द

मोहम्मद सिराज याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. टीम इंडियासाठी सिराजने 29 कसोटी सामने खेळले आहेत.ज्यामध्ये त्याने 78 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 15 धावांत 6 विकेट्स आहे. भारतासाठी त्याने 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 71 विकेट घेतल्या आहेत. सिराजने 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने 14 विकेट घेतल्या आहेत.

;

संघर्षाच्या बळावर सिराज आला पुढे

सिराजच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती. पण असं असताना देखील त्याने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. त्याच्या मेहनतीच्या जोरावर तो आज पुढे आला आहे. मोहम्मद सिराज याने पहिल्यांदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. यानंतर त्याने टीम इंडियात स्थान मिळवले आणि आता तो आयपीएलमध्येही दमदार कामगिरी करताना दिसत आहे.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.