Father’s Day 2021 : वडिलांच्या आठवणीत सचिन भावूक, स्पेशल व्हिडीओ शेअर करत जागवल्या आठवणी
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असणाऱ्या सचिनने त्याच्या वडिलांच्या आठवणीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात त्याने त्याच्या वडिलांची एक विशेष वस्तू सर्वांना दाखवली आहे.
मुंबई : क्रिकेट जगतात ज्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अधिराज्य गाजवलं ते नाव म्हणजे ‘सचिन रमेश तेंडुलकर.’ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असणाऱ्या सचिनने देखील आज Father’s Day साजरा करत सोशल मीडियावर एक विशेष व्हिडीओ पोस्ट केला आहे. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांच्या आठवणीत सचिनने हा व्हिडीओ शेअर केला असून यात त्याने त्याच्या वडिलांची एक जपून ठेवलेली गोष्ट सर्वांसोबत शेअर केली आहे. (Indian Cricketer Sachin Tendulkar shares video of fathers memories On Ocasion of Fathers day 2021)
सचिनने जो व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये तो एका झोपाळ्याबाबत सर्वांना माहिती देतो आहे. विशेष म्हणजे तो झोपाळा त्याच्या वडिलांचा पाळणा असून कायम तो त्याच्यासोबत राहावा, त्याला तो वापरता यावा यासाठी त्याने त्याचा झोपाळा करुन घेतला असल्याचंही त्याने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. सचिन हे सांगत असताना भावूक ही झाला तसंच त्याने या झोपाळ्यात बसल्यावर आपुलकी वाटते, एक वेगळी एनर्जी येते असंही सांगितल. या व्हिडीओतून सचिनने त्याच्या वडिलांबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.
We have some things that act as time machines for us. A song, a smell, a sound, a flavour.
For me, it’s something from my Father’s childhood that always takes me on a trip down memory lane. On #FathersDay I want to share that special place with you all. Miss you always, Baba. pic.twitter.com/I9LXa7wgMK
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 20, 2021
…तरी सचिन खेळला होता
सचिनला क्रिकेट इतिहासातील दिग्गज फलंदाज म्हणून संबोधलं जात. पण या पदवीसाठी सचिनने बरीच मेहनत घेतली आहे. अगदी कमी वयात दिग्गज गोलंदाजाचा सामना करणारा सचिन प्रत्येक परिस्थितीत भारतासाठी मैदानावर उतरला होता. अशीच एक आठवण बऱ्याच जणांच्या विस्मरणात गेली असेल. ती म्हणजे 1999 च्या विश्वचषकादरम्यान सचिनने केनियाविरुद्ध जी धडाकेबाज 140 धावांची खेळी केली होती. ती त्याचे वडिल वारल्यानंतर अवघ्या तीन दिवसानंतर केली होती. सचिनने एका मुलाखतीत तेव्हाची आठवण सांगितली. अचानक वडिलांच्या निधनामुळे खचलेल्या सचिन वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार होता. पण तेव्हा त्याच्या आईने त्याला विश्वचषक खेळचं असा आग्रह केल्यानंतर सचिन मैदानात उतरला होता.
हे ही वाचा –
Father’s Day : कियारा ते महेश बाबूपर्यंत सेलिब्रिटींच्या खास पोस्ट, ‘फादर्स डे’च्या दिल्या शुभेच्छा!
Father’s Day 2021 : ‘फादर्स डे’ निमित्त हीना खानची भावनिक पोस्ट, म्हणाली हे फोटो तुम्हाला दाखवले नाही कारण…
(Indian Cricketer Sachin Tendulkar shares video of fathers memories On Ocasion of Fathers day 2021)