लहाणग्या फिरकीपटूचा फॅन झाला सचिन तेंडुलकर, VIDEO शेअर करत केलं कौतुक
सचिन तेंडुलकर कायम उत्कृष्ट खेळाडूंचे व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो. अनेकदा हे प्रसिद्ध खेळाडू असतात. पण आता त्याने एका लहाणग्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई: भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) कायम प्रतिभावान खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्या अप्रतिम खेळाचे व्हिडिओ शेअर करत असतो. सध्या मुंबई इंडियन्स संघासोबत असतानाही सचिन अनेकदा ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना मोलाचे सल्ले देताना दिसतो. सचिन क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी तो क्रिकेटपासून अजिबात दूर गेलेला नाही.
नुकताच सचिनने एका चिमुकल्याचा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये एक छोटा मुलगा उत्कृष्ट अशी फिरकी गोलंदाजी करताना दिसत आहे. तो फलंदाजाना अगदी चकवून चेंडूला थेट स्टंपात किंवा मागे विकेटकिपरच्या हातात टाकत आहे. सचिननेही या चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर करत त्याच कौतुक केलं आहे.
खेळाप्रतीचं प्रेम अद्भुत
व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये सचिनने लिहिलं आहे की, ‘वाह! हा व्हिडीओ मला एका मित्राकडून मिळाला.हा व्हिडीओ अप्रतिम आहे. खेळाप्रती या चिमुकल्याचं प्रेम कमालीचं आहे.’ दरम्यान व्हिडीओमध्ये असलेला चिमुकला लेग-ब्रेक गोलंदाजी करत आहे. तो छोट्याशा व्हिडीओ क्लिपमध्ये विविध प्रकारे फलंदाजाला चकवा देताना दिसत आहे. तो अगदी मजा घेऊन खेळताना दिसत आहे हे विशेष!
Wow! ?
Received this video from a friend…
It’s brilliant. The love and passion this little boy has for the game is evident.#CricketTwitter pic.twitter.com/q8BLqWVVl2
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 14, 2021
काही दिवसांपूर्वीच शिखा पांडेचा व्हिडीओ केला होता शेअर
काही दिवसांपूर्वीच सचिनने भारतीय महिला गोलंदाज शिखा पांडे हीचाही व्हिडीओ शेअर केला होता. शिखाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर ऑस्ट्रेलीयाची सलामीवीर एलिसा हीलीला त्रिफळाचित केलं. ऐकायला जरी ही सामन्य विकेट वाटत असली तरी ज्याप्रकारे हा चेंडू फेकण्यात आला आणि स्विंग झाला ते पाहून चांगल्या चांगल्यांचे डोळे फिरले होते. अनेकांनी तर या डिलेव्हरीला महिला क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट डिलेव्हरी असल्याचंही म्हटलं आहे. अनेकांनी या डिलेव्हरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत त्याचं कौतुक केलं. सचिनने ही या व्हिडीओला जादूई डिलेव्हरी म्हणत त्याचं कौतुक केलं होतं.
Pure magic! ? A sensational delivery this. Well done Shikha Pandey! ??@shikhashauny https://t.co/KwEMWfgAgk
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 14, 2021
हे ही वाचा
मोठी बातमी: T20 World Cup 2021 नंतर विराट आणि रोहित संघाबाहेर, युवा खेळाडूंना मिळणार संधी
KKR vs CSK IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सच्या मनात केकेआरच्या ‘त्रिकुटा’ची भिती, धोनीच्या चिंतेतही वाढ
T20 World Cup मधल्या सिक्सर किंग्सची यादी, टॉप 5 मध्ये भारताचा एकमेव खेळाडू
(Indian Ex cricketer Sachin Tendulkar shares viral video of six year old leg spinner from barishal)