Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुभमनच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर, वाचा किती काळ गिलला संघाबाहेर रहावे लागणार

भारताचा कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्मा सोबत सलामीला उतरणारा शुभमन गिल दुखापत ग्रस्त झाला आहे. त्यामुळे 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो खेळण्याची शक्यता फार कमी आहे.

शुभमनच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर, वाचा किती काळ गिलला संघाबाहेर रहावे लागणार
Shubhman Gill
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 7:20 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभवानंतर आता इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मात्र या मालिकेआधीच भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) दुखापतग्रस्त झाल्याची माहिती बुधवारी (30 जून) समोर आली. त्याला नेमकी काय दुखापत झाली आहे आणि कितीकाळ विश्रांती घ्यावी लागेल हे स्पष्ट नसल्याने भारतीय क्रिकेट प्रेमी चिंतेत होते. दरम्यान गिलच्या दुखापतीबद्दल माहिती समोर आली असून त्याला आणखी काही काळ विश्रांती घेणे अनिवार्य आहे.

शुभमनच्या पायाला (गुडघा आणि तळवा यांच्यामधील भाग) दुखापत झाली आहे. महत्त्वाच्या भागाला दुखापत झाल्याने पुढील काही काळ शुभमनला विश्रांती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेचे सुरुवातीचे सामने तर शुभमन मुकण्याची दाट शक्यता आहे. पाचव्या सामन्यात शुभमन पुनरागमन करु शकतो अशी माहिती समोर येत असून तूर्तास तरी त्याला विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढील दोन महिने गिल क्रिकेटपासून दूर राहणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या (BCCI) सूत्रांनी पीटीआयला दिली.

WTC Final मध्ये वाढली दुखापत

न्यूझीलंड विरुद्ध भारत (India vs New Zealand) यांच्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) शुभमनची दुखापत जास्त वाढल्याची माहिती समोर येत आहे. हा सामना भारताने 8 विकेट्सने गमावला. मात्र सामन्य़ात भारताला पहिली विकेट घेऊन देण्यात शुभमनने घेतलेली कॅच अत्यंत महत्त्वाची ठरली. दरम्यान एका माजी वेगवान भारतीय गोलंदाजाने पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितले की, “शुभमनच्या पायाला ज्या ठिकाणी दुखापत झाली आहे, त्याठिकाणची दुखापत ठिक होण्यासाठी सक्त विश्रांतीची आवश्यकता असते. ही दुखापत ठिक होण्यासाठी 2 ते 3 महिन्यांचा काळ लागू शकतो”

गिलसाठी पर्याय उपलब्ध

भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरोधात कसोटी मालिका खेळायची असून यावेळी शुभमन जागी सलामीसाठी सर्वात पहिला पर्याय म्हणजे मयांक अगरवाल (Mayank Agarwal) याचा आहे. कारण याआधी इंग्लंड दौऱ्यावर मयांक इंग्लंड विरोधात सलामीला उतरला असून त्याने इंग्लंडच्या मैदानावर चांगली खेळी केली होती. त्यानंतर गिलच्या जागेसाठी दुसरा प्रबळ दावेदार आहे भारताचा स्टार क्रिकेटर के एल राहुल (KL Rahul). राहुलने याआधी मुरली विजयसह मिळून भारतासाठी काही कसोटी सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली आहे. लोकेश आणि मयांक यांच्याशिवाय आणखी एक फलंदाज सलामीसाठी उतरु शकतो. तो म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा हनुमा विहारी (Hanuma Vihari). दरम्यान या सर्व अनुभवी खेळाडूंसह भारतीय संघाकडे आणखी एक खेळाडू सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडू शकतो. तो म्हणजे भारतीय संघासोबत स्टँड बाय खेळाडू म्हणून गेलेला अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran). 25 वर्षीय अभिमन्यूने64 प्रथम श्रेणी सामन्यांत 4 हजार 402 धावा केल्या आहेत. 43.57 च्या सरासरीने केलेल्या या धावांमध्ये 13 शतकांसह 18 अर्धशतकांचा समावेश आहे.

हे ही वाचा –

IND vs ENG Test Series : शुभमन गिलला दुखापत, रोहित सोबत सलामीसाठी कोण उतरणार?, ‘हे’ आहेत प्रमुख दावेदार

दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर कपिल देव ‘या’ गोष्टीवरुन भारतीय गोलंदाजांवर नाराज, म्हणतात ‘अशी परिस्थिती पाहून वाईट वाटतं’

WTC Final मधील खेळीमुळे जसप्रीतला मोठे नुकसान, अडीच वर्षानंतर ओढवली ‘ही’ परिस्थिती

(Indian Opener Shubman Gill Got Injuredhe Could be out for 2 months In Indias Tour of England)

स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?.
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला.
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं.
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत..
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत...
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?.
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....