मिताली राजचं टीकाकारांना उत्तर, म्हणाली, ‘माझं काम लोकांना खूश करण्याचं नाही!’

महिला संघाची कर्णधार मिताली राजने शनिवारी इंग्लंडविरुद्ध मॅच विनिंग खेळी खेळली. याचबरोबर तिने 2 जागतिक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले. परंतु या सामन्यात स्लो बॅटिंग स्ट्राईक रेटमुळे तिला टीकाकारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. | Mithali Raj

मिताली राजचं टीकाकारांना उत्तर, म्हणाली, 'माझं काम लोकांना खूश करण्याचं नाही!'
मिताली राज
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 7:48 AM

मुंबई : “माझं ध्येय लोकांना खूश करणं नाहीय. संघ व्यवस्थापनाने मला दिलेली भूमिका निभावण्यासाठी मी इथे आले आहे. जेव्हा आपण एखाद्या लक्ष्याचा पाठलाग करता तेव्हा आपण धावा करण्यासाठी गोलंदाजांना निवडण्याबरोबरच आपल्या स्ट्राँग गोष्टींवर भरोसा करत असता. लोकांकडून मला कोणत्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही”, असं म्हणत भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) स्लो बँटिंग स्ट्राईक रेटवरुन होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.  (Indian Women Cricketer Mithali Raj Said I Dont Need Certification From people Over her Critics For Slow Batting Strike Rate)

महिला संघाची कर्णधार मिताली राजने शनिवारी इंग्लंडविरुद्ध मॅच विनिंग खेळी खेळली. याचबरोबर तिने 2 जागतिक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले. परंतु या सामन्यात स्लो बॅटिंग स्ट्राईक रेटमुळे तिला टीकाकारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मात्र वर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये मितालीने टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

मितालीचं टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर

“माझं काम लोकांना खूश करण्याचं नाहीये. स्लो स्ट्राईक रेटवरुन होणारी टीका मी वर्तमानपत्रातून वाचली आहे. परंतु मला मैदानावर नेमकं काय करायचंय हे मला चांगलं माहिती आहे. लोकांकडून मला सर्टिफिकेशनची अजिबात गरज नाहीये. खूप मोठ्या काळापासून मी खेळत आहे आणि माझ्यावर संघाची काय जबाबदारी आहे हे देखील मला चांगलं माहित आहे”, अशा कठोर शब्दात तिने टीकाकारांना सुनावलं आहे.

आयर्लंड विरुद्ध 26 जून 1999 रोजी मी मिल्टन केयेन्स येथे मिताली राजने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यावेळेसपासून ते आत्तापर्यंत हा प्रवास सोपा नव्हता. आव्हानांनी भरलेला हा रस्ता होता. या प्रवासात असे अनेक प्रसंग आले जेव्हा मला वाटलं की आता बस झालं…. परंतु अशा काही गोष्टी घडत होत्या ज्या गोष्टींनी मी खेळत राहावं असं मला वाटायचं… आणि आता माझ्या क्रिकेट कारकिर्दीला 22 वर्षे पूर्ण झालीत… रन्सची भूक आणखीही थांबलेली नाहीये.. पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये दिमाखदार खेळ करण्याचा मानस मितालीने बोलून दाखवला.

मितालीचा भीम पराक्रम

याआधी केवळ भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा केलेल्या मितालीने आता आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेेळाडू ठरली आहे. 38 वर्षीय मितालीने 317 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 हजार 337 धावा करत इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्स (Charlotte Edwards) हिचे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचे रेकॉर्ड तोडले आहे. एडवर्ड्सने 10 हजार 273 रन केले आहेत.

(Indian Women Cricketer Mithali Raj Said I Dont Need Certification From people Over her Critics For Slow Batting Strike Rate)

हे ही वाचा :

महेद्रसिंह धोनीच्या घरी नवी पाहुणी, लग्नाच्या वाढदिवसादिवशी पत्नी साक्षीने दिली माहिती, फोटोही केला पोस्ट

Photo : 5 वर्ष संघातून बाहेर, इंग्लंड दौऱ्यात पुनरागमन, अष्टपैलू खेळी करत जिंकली सर्वांचीच मनं

BCCI च्या घोषणेनंतर स्थानिक क्रिकेट स्पर्धांच्या तयारीला सुरुवात, कर्नाटक क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसमोर ठेवली ‘ही’ अट

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.