17 वर्षांच्या शेफाली वर्माची कमाल, 50 वर्षापूर्वीच्या गावस्करांच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी!
शेफाली वर्मा हिने भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या विक्रमाशी केली आहे. (Indian Women Cricketer Shefali verma Equal Sunil Gavaskar record)
मुंबई : भारतीय महिला संघात एका सतरा वर्षांच्या फलंदाजांने कहर केलाय. प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाला तीन हैरान करून सोडलंय. त्या फलंदाजाचे नाव आहे जेमतेम सतरा वर्षांची शेफाली वर्मा (Shefali Verma)… कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच पहिल्या डावात तिने 96 धावा ठोकून इंग्लंडच्या संघाला पुरतं हैरान केलं तर दुसऱ्या डावातही तिने अर्धशतक ठोकून आपल्यातली क्षमता आणि प्रतिभा दाखवली. शेफाली वर्मा हिने भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या विक्रमाशी केली आहे. (Indian Women Cricketer Shefali verma Equal Sunil Gavaskar record)
सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी
शेफाली वर्मा हिने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरुद्ध दमदार प्रदर्शन केलंय. याचबरोबर तिनं आपल्या नावावर खास रेकॉर्ड देखील केला आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गावस्कर यानंतर शेफाली पहिली अशी बॅट्समन ठरली आहे जिने कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच दोन्ही डावात अर्धशतक ठोकलंय.
गावस्करांचा विक्रम काय?
सुनील गावस्कर यांनी 6 मार्च 1971 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. त्यांनी पहिल्या डावात 65 धावा आणि दुसऱ्या डावात 67 धावा केल्या होत्या. इतकंच नाही तर त्यांनी भारतासाठी विजयी धाव घेतली होती.
भारतीय महिला संघ संकटात?
काउंटी क्रिकेट ग्राउंड वर खेळला जाणाऱ्या भारत आणि इंग्लंड या एकमेव कसोटी सामन्यात भारताचा संघ सध्या अडचणीत सापडला आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेर भारतीय संघ 82 धावांनी पिछाडीवर आहे तसंच फॉलोऑन सुद्धा खेळतोय. इंग्लंड 9 बाद 396 धावांवर आपला डाव घोषित केला आहे. त्याच्या प्रत्युत्तरादाखल भारत पहिल्या डावात 230 धावांवर आऊट झालाय. त्यामुळे भारताला फॉलोऑन खेळणं भाग पडलं आहे.
(Indian Women Cricketer Shefali verma Equal Sunil Gavaskar record)
हे ही वाचा :
ICC WTC Final : भारत आणि न्यूझीलंडमधील सामना डेन्मार्कमध्ये ? वाचा काय आहे नेमकं प्रकरण