T20 world Cup ला मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्ती मुकणार?, दुखापतीनंतरही आयपीएलमधून माघार नाहीच, काय आहे नेमकं प्रकरण?

आगामी टी20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये पार पडणार आहे. या आगामी विश्वचषकासाठी बीसीसीआयने याआधीच आपला संघ जाहीर केला आहे. पण या संघामध्ये बदल होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.

T20 world Cup ला मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्ती मुकणार?, दुखापतीनंतरही आयपीएलमधून माघार नाहीच, काय आहे नेमकं प्रकरण?
वरुण चक्रवर्ती
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 9:32 PM

मुंबई : सध्या भारतीय क्रिकेटप्रेमी आयपीएलच्या (IPL 2021) सामन्यात व्यस्त आहेत. पण आयपीएलनंतर लगेचच सुरु होणाऱ्या महत्त्वाच्या टी-20 विश्वचषकाकडेही (ICC T20 World Cup) भारतीयांचे लक्ष्य लागून राहिले आहे. आयसीसीने (ICC) सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वीच भारतीय संघही जाहीर केला. पण आता या संघातील एक महत्त्वाचा खेळाडू असणाऱ्या वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकण्याची भिती वर्तविली जात आहे. ज्यामुळे बीसीसीआयची डोकेदुखीही वाढली आहे.

आयपीएलमध्ये उत्तम कामगिरीमुळे आगामी टी20 विश्वचषकासाठी भारताचा प्रमुख गोलंदाज मानला जाणारा  तामिळनाडूचा गोलंदाज वरुण सध्या दुखापतीमुळे ग्रस्त आहे. दरम्यान भारतीय संघ 10 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करु शकत असला तरी वरुणची आयपीएलमधील कामगिरी पाहता त्याला संघाबाहेर करणार नाहीत हे नक्की, पण त्याची दुखापत वाढल्यास तो ऐन सामन्यांवेळी खेळू न शकल्यास मात्र भारतीय संघ अडचणीत सापडू शकतो.

‘सध्या लक्ष्य टी20 विश्वचषक’

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितलं,‘वरुणच्या गुडघ्यांची दुखापत अजून पूर्णपणे ठिक झालेली नाही. त्याला त्रास होतो. पण टी20 वर्ल्ड कप ही मोठी स्पर्धा असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन ही रिस्क घेत आहे. सध्या सर्व लक्ष्य टी20 विश्वचषकावर असून वरुणला शक्य तितका आराम देण्यावर आमचा भर आहे.’ वरुणने आतापर्यंत आयपीएल 2021 मध्ये 6.73 च्या इकोनॉमीने 13 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या आहेत.

टी 20 विश्वचषकासाठी भारत तयार

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

हे ही वाचा 

T20 world Cup 2021 पूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका, स्टार ऑलराउंडर IPL मध्ये दुखापतग्रस्त, विश्वचषकालाही मुकणार

उत्तम T20 क्रिकेटर व्हायचंय?, कोहली किंवा गेलला नाही तर ‘या’ खेळाडूला फॉलो करा, माजी इंग्लंड कर्णधाराचा युवांना सल्ला

जगातील प्रख्यात पुरुष क्रिकेट संघ, पण महिला संघाला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी लागली 38 वर्ष, अखेर रचला इतिहास

(Indias Young spiner Varun Chakravarthy injury may ruled out him from ICC t20 world cup BCCI in tension)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.