INDvSA: रोहित दुखापतग्रस्त असल्याने सलामीच्या जागेसाठी ‘या’ तिघांमध्ये चुरस

आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (South Africa tour) सुरुवात होण्याआधीच भारतीय संघासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पहिला चेंडू टाकण्याआधीच भारताला दोन झटके बसले आहेत.

INDvSA: रोहित दुखापतग्रस्त असल्याने सलामीच्या जागेसाठी 'या' तिघांमध्ये चुरस
दुसरीकडे या फॉरमॅटमध्ये भारताचा नवा कर्णधार बनलेल्या रोहित शर्मालाही उत्कृष्ट फॉर्मचा फायदा झाला असून दोन स्थानांनी झेप घेत तो 13 व्या स्थानावर पोहोचला आहे. रोहितने विश्वचषकातील शेवटच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दोन अर्धशतकांसह 159 धावा केल्या होत्या.
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 7:24 PM

मुंबई: आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (South Africa tour) सुरुवात होण्याआधीच भारतीय संघासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पहिला चेंडू टाकण्याआधीच भारताला दोन झटके बसले आहेत. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit sharma) दुखापतीमुळे जायबंदी झाला असून तो तिन्ही कसोटी सामन्यांना मुकणार आहे. दुसऱ्या बाजूला भारताचा भरवशाचा फलंदाज विराट कोहलीने (Virat kohli) वनडे सामन्यांमधून ब्रेक घेतला आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी विराटने सुट्टी घेतली आहे.

या दोन्ही प्रमुख खेळाडूंविना भारताची टेस्ट सीरीज आणि वनडेमध्ये कसोटी लागणार आहे. रोहितच्या जागी प्रियांक पांचाळची संघात निवड झाली असली, तरी त्याला थेट सलामीला पाठवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेईल, असे वाटत नाही. सलामीच्या जागेसाठी सध्या लोकेश राहुल, प्रियांक पांचाळ आणि हनुमा विहारीचा पर्याय उपलब्ध आहे. दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंड विरुद्ध झळकवलेल्या शानदार शतकामुळे मयांक अग्रवालची सलामीची जागा जवळपास पक्की समजली जात आहे. दुखापतीमुळे शुभमन गिलचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे सलामीच्या जागेसाठी तिघांमध्ये चुरस आहे.

केएल राहुल इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत केएल राहुलने रोहित शर्मासोबत सलामीवीराची भूमिका पार पाडली होती. दोघांनी दमदार कामगिरी केली होती. चार सामन्यानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये राहुल दुसऱ्या स्थानावर होता. त्याने 315 धावा केल्या होत्या. त्याने शतकासह अर्धशतकी खेळी केल्या होत्या. रोहितने या मालिकेत सर्वाधिक 368 धावा केल्या होत्या. दुखापतीमुळे राहुल अलीकडेच न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकला होता. या मालिकेआधी तो जबरदस्त फॉर्मममध्ये होता. टी-२० वर्ल्डकपमध्ये सहा सामन्यात त्याने 194 धावा केल्या.

प्रियांक पांचाळ रोहितच्या जागी संघात निवड झाल्यामुळे प्रियांक पांचाळ चर्चेत आहे. अनेक क्रिकेटप्रेमींसाठी हे नवीन नाव आहे. प्रियांक रोहितची उणीव भरुन काढू शकतो का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. पण प्रियांक पांचाळने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पांचाळने १०० स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये 45.52 च्या सरासरीने 7,011 धावा केल्या आहेत. नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने भारतीय अ संघाकडून खेळताना तीन डावात 120 धावा केल्या आहेत.

हनुमा विहारी हनुमा विहारी भारतीय ‘अ’ संघाकडून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. मिळालेल्या संधीचं सोन करत, विहारीने या दौऱ्यात तीन अर्धशतक झळकवली. मालिकेत हनुमा विहारीने सर्वाधिक 227 धावा केल्या. हनुमा विहारी मधल्या फळीतील फलंदाज आहे. पण चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांचे मधल्या फळीतील स्थान लक्षात घेता, हनुमा विहारीला सलामीला पाठवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. हनुमा विहारीच्या क्षमतेबद्दल प्रश्न नाही. कारण त्याने याआधी कसोटीत भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका बजावली आहे.

संबंधित बातम्या:

‘ब्रेक घेण्यात काहीच चुकीचं नाही, पण…’, कोहलीच्या सुट्टीवर अझरुद्दीनचं रोखठोक मत मुंबईला 3 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या जयवर्धनेकडे श्रीलंकेला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देण्याची जबाबदारी ‘आव्हानांचा विचार केला, तर…’, टेस्ट टीममध्ये निवड झाल्यानंतर प्रियांक म्हणाला…

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.