IPL 2022 Auction च्या पहिल्या दिवशी बोलर, विकेटकीपरवर पैशांचा पाऊस, टीम मॅनेंजमेंटकडून 350 कोटींची बरसात

सर्वाधिक बोली इशान किशनवर (Ishan Kishan) लागली. तो युवराज सिंग यांच्यानंतरचा सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. इशान किशन ला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या मोठी चुरस होती.

IPL 2022 Auction च्या पहिल्या दिवशी बोलर, विकेटकीपरवर पैशांचा पाऊस, टीम मॅनेंजमेंटकडून 350 कोटींची बरसात
आयपीएल लिलाव
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 8:12 AM

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022 Auction) म्हणजेच आयपीएलसाठी काल लिलाव पार पडला. या लिलावामध्ये सर्वाधिक बोली इशान किशनवर (Ishan Kishan) लागली. तो युवराज सिंग यांच्यानंतरचा सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. इशान किशन ला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या मोठी चुरस होती. अखेर मुंबईनं 15 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केलं. पहिल्या दिवशी बॅटसमन सोबत विकेटकीपर आणि बोलरवर देखील मोठी बोली लागली. दिपक चाहरला चेन्नई सुपर किंग्जनं 14 कोटी रुपये खर्चून खरेदी केलं. शार्दूल ठाकूर याला दिल्ली कॅपिटल्सनं 10.75 कोटी रुपये, प्रसिद्ध कृष्णा याला राजस्थान रॉयल्सनं 10 कोटी रुपये, लॉकी फर्ग्यूसनला गुजरात टाटन्सनं 10 कोटी, कगिसो रबाडा याला 9.25 कोटी, ट्रेंट बोल्टला आठ कोटी, जोश हेझलवूड, 7.75 कोटी , मार्क वूडला 7.50 कोटी आणि आवेश खान याला लखनऊ सुपरजायएंटसनं 10 कोटींची बोली लावत खरेदी केलं.

विकेटकीपर्सवर पैशांची बरसात

आयपीएलच्या 2022 च्या सीझनसाठी लिलावात विकेटकीपरवर मोठी बोली लागली. निकोलस पूरन याला 10.75 कोटींची बोली लावत सनरायजर्स हैदराबादनं खरेदी केला. दिनेश कार्तिक याला आरसीबीनं 5.5 कोटी रुपये देऊन घेतलं. तर, जॉनी बेयरस्टोला पंजाब किंग्जनं 6.75 कोटी रुपये देऊन खरेदी केलं. अंबाती रायडूला देखील चेन्नई सुपरकिंग्जनं पुन्हा खरेदी केलं.

परदेशी स्पिनर्स वर बोली लागलीच नाही

आयपीएलच्या दहा टीम्सनं परदेशी स्पिनर्सना खरेदी करण्यात रस दाखवला नाही. टीम इंडियाचा लेग स्पिनर यजुवेंद्र चहलला राजस्थान रॉयल्सनं 6 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलं. तर, राहुल चहर याला पंजाबनं 5 कोटी 25 लाखांना खरेदी केलं. तर, कुलदीप यादवला दिल्लीनं 2 कोटीला खरेदी केलं. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आर. आश्विन याला राजस्थाननं पाच कोटी रुपयांना खरेदी केलं.

श्रेयस अय्यर आणि हर्षल पटेल यांच्यावर 10 कोटींपेक्षा अधिक बोली

श्रेयस अय्यर याला कोलकाता नाईट रायडर्सनं 12 कोटी 25 आपल्या टीममध्ये घेतलं. तर गेल्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या हर्षल पटेलला आरसीबीनं 10 कोटी 75 लाख रुपयांना पुन्हा टीममध्ये घेतलं. कोलकाताच्या टीमनं पॅट कमिन्सला 7 कोटी 25 लाख रुपयांना घेतलं. शिखर धवनला पंजाब किंग्जनं आठ कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केलं. वेस्ट इंडिजचा टी-20 स्पेशालिस्ट जैसन होल्डर याला लखनऊनं पावणे नऊ कोटीला घेतलं. शिमरोन हेटमायरला राजस्थान रॉयल्सनं साडे आठ कोटींना आपल्या संघात घेतलं.

सुरैश राना, नबी आणि शाकिबवर बोली लागलीच नाही

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरैश रैना, विकेटकीपर वृद्धिमान साहा, स्टीव स्मिथ, डेविड मिलर, सॅम बिलिंग्ज, मोहम्मद नबी, शाकिब अल हसन यांच्यावर कोणत्याही टीमनं बोली लावली नाही.

इतर बातम्या:

IPL Auction 2022 : रग्गड कमाई करणाऱ्या आयपीएल खेळाडूंना इनहॅन्ड किती मिळतात? टॅक्स किती बसतो?

IPL Auction 2022: शार्दूल ठाकूरला दहा कोटींना विकत घेतलं तर त्या मालकाला किती फायदा होतो? समजून घ्या आयपीएलचं बिझनेस मॉडेल?

IPL 2022 auction Ishan Kishan Deepak chahar Shreyas Iyer Shardul Thakur Avesh Khan get big money big names were unsold during Auction

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.