IPL 2022 Auction Live Streaming: 590 खेळाडूंच्या नशीबाचा होणार फैसला, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसं पाहू शकता ऑक्शन
IPL Auction 2022 Live Updates: IPL 2022 मेगा ऑक्शन अनेक अंगांनी खास आहे. क्रिकेट चाहत्यांना या ऑक्शनची उत्सुक्ता लागली आहे. यंदा आयपीएलच्या Mega Auction मध्ये आठ ऐवजी दहा संघ आहेत.
बंगळुरु: IPL 2022 मेगा ऑक्शन अनेक अंगांनी खास आहे. क्रिकेट चाहत्यांना या ऑक्शनची उत्सुक्ता लागली आहे. यंदा आयपीएलच्या Mega Auction मध्ये आठ ऐवजी दहा संघ आहेत. गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन नवीन संघ पहिल्यांदा ऑक्शनमध्ये सहभागी होणार आहेत. 10 फ्रेंचायजी 590 खेळाडूंवर बोली लावणार आहेत. 590 पैकी 228 कॅप्ड आणि 355 अनकॅप्ड खेळाडू आहेत. सलग चौथ्यांदा ह्यूज एडमीड्स ऑक्शनची जबाबदारी संभाळणार आहेत. यंदाच्या ऑक्शनमध्ये बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, मिचेल स्टार्क आणि ख्रिस गेल सारखे मोठे खेळाडू दिसणार नाहीत. वेगवेळ्या कारणांमुळे त्यांनी माघार घेतली आहे. ऑक्शनमध्ये जवळपास 50 खेळाडूंची बेस प्राइस दोन कोटी रुपये आहे. 24 पेक्षा अधिक खेळाडूंची बेस प्राइस 1.5 कोटी रुपये आहे.
अनेक खेळाडूंची प्राइस एक कोटी रुपये आहे. त्याशिवाय 50 लाख 30 लाख आणि 20 लाख बेस प्राइसवाले खेळाडू सुद्धा मेगा ऑक्शनमध्ये आहेत. मेगा ऑक्शनआधी एकूण 33 खेळाडूंना रिटेन करण्यात आलं आहे. आठ जुन्या फ्रेंचायजींनी 27 खेळाडूंना रिटेन केलं होतं. त्यानंतर दोन नव्या संघानी लिलावाआधी प्रत्येकी तीन खेळाडू निवडले आहेत.
IPL 2022 चं मेगा ऑक्शन कधी होणार? आयपीएल 2022 चं मेगा ऑक्शन 12 आणि 13 फेब्रुवारीला (शनिवार आणि रविवारी ) होणार आहे.
आयपीएल 2022 चे मेगा ऑक्शन कुठे होणार? आयपीएल 2022 चं मेगा ऑक्शन बंगळुरुमध्ये पार पडणार आहे.
किती वाजता सुरु होणार आयपीएल 2022 मेगा ऑक्शनचा लिलाव? आयपीएल 2022 मेगा ऑक्शन दुपारी 12 वाजता सुरु होईल.
आयपीएल 2022 ऑक्शनचं लाइव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? टीव्हीवर प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्सवर वाहिनीवर ऑक्शनचं Live टेलिकास्ट पाहता येईल.
आयपीएल 2022 ऑक्शनचं LIVE स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल? OTT प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर (Hotstar) आयपीएल 2022 ऑक्शनचं LIVE स्ट्रीमिंग पाहता येईल.