IPL 2022: शुभमन गिलला गमावण्याचा KKR च्या हेड कोचनी आयुष्याशी जोडला संबंध म्हणाले….
KKR चे हेड कोच ब्रेन्डन मॅककुलम यांनी यंदाच्या मोसमात त्यांच्या टीमची काय रणनिती असेल, यावर प्रकाश टाकला. यंदाच्या IPL मध्ये शुभमन गिल (Shubman Gill) कोलकाताकडून खेळताना दिसणार नाही.
मुंबई: आयपीएलमधील (IPL) सर्वच फ्रेंचायजी सध्या पुढच्या महिन्यात होणाऱ्या मेगा ऑक्शनची (Mega Auction) तयारी करत आहेत. महेंद्रसिंह धोनी चेन्नईमध्ये दाखल झालाय, तर गौतम गंभीर यांनी, आयपीएलमध्ये खेळताना लखनऊ सुपर जायंट्सचा काय विचार आणि प्लानिंग असेल ते स्पष्ट केले. यंदाच्या आयपीएलमध्ये आठ ऐवजी दहा संघ आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ आहेत. प्रत्येक फ्रेंचायजीने त्यांचे चार खेळाडू रिटेन केले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सही मेगा ऑक्शनची तयारी करत आहे. KKR चे हेड कोच ब्रेन्डन मॅककुलम यांनी यंदाच्या मोसमात त्यांच्या टीमची काय रणनिती असेल, यावर प्रकाश टाकला. यंदाच्या IPL मध्ये शुभमन गिल (Shubman Gill) कोलकाताकडून खेळताना दिसणार नाही. त्याबद्दल मॅककुलम यांना निराशा व्यक्त केली.
शुभमन गिलसाठी मोजले आठ कोटी शुभमन गिलसारख्या तरुण, प्रतिभावान सलामीवीराला गमावणं, खूपच निराशाजनक आहे, असं मॅककुलम यांनी म्हटलं आहे. शुभमन गिलं केकेआरकडून आयपीएलमध्ये एकूण 58 सामने खेळला आहे. पण कोलकाताना त्याला यंदाच्या मोसमासाठी रिटेन केलं नाही. गिलला आयपीएलमधील नवीन संघ अहमदाबादने आपल्या चमूत घेतलं आहे. त्याच्यासाठी अहमदाबाद टीमने आठ कोटी रुपये मोजले आहेत. आयुष्य असंच आहे
“तुम्ही अनेक खेळाडू गमावणार आहेत, त्यामुळे तुम्हाला आधीच तशी प्लानिंग केली पाहिजे. शुभमन गिल सारख्या खेळाडूला गमावणं निराशाजनक आहे. पण आयुष्य असंच आहे. आम्ही आगामी लिलावासाठी पूर्णपणे तयार आहोत” असे हेड कोच ब्रेन्डन मॅककुलम यांनी केकेआरसाठीच्या लाइव्ह सेशनमध्ये सांगितलं.
“I’d love to hear some suggestions from the fans: Which players do they think we should target and also, why?” – @Bazmccullum
Register for #KKRMockAuction here ? https://t.co/vsfROhjYuZ if you haven’t already!#GalaxyOfKnights #KKR #IPL pic.twitter.com/k8MOOZ1ddQ
— KolkataKnightRiders (@KKRiders) January 29, 2022
आंद्रे रसेल आणि सुनील नरेन या दोन परदेशी खेळाडुंना केकेआरने आपल्या ताफ्यात कायम ठेवलं आहे. वेंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांनाही दोनवेळच्या आयपीएल विजेत्या कोलकाताने रिटेन केलं आहे. लिलावाआधी 42 कोटी रुपये खर्च केले आहेत.
IPL 2022 Losing Shubman Gill was disappointing says KKR coach Brendon McCullum