Sara Tendulkar : किसी का भाई किसी की जान… अर्जुन तेंडुलकर आणि शुभमन गिल आमनेसामने येताच सारा का होतेय ट्रेंड?
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना काल पार पडला. या सामन्यात मुंबईकडून अर्जुन तेंडुलकरने पहिली ओव्हर टाकली. तर ओपनर म्हणून शुभमन गिल खेळत होता. दोघे समोरासमोर येताच...
नवी दिल्ली : आयपीएल सामन्यात काल बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आले होते. या सामन्यात गुजरात टीमचा ओपनर शुभमन गिलने धडाकेबाज कामगिरी केली. शुभमनने आपल्या खास स्टाईलमध्ये वेगाने अर्धशतक झळकावलं. तो मोठी खेळी खेळू शकला नाही. पण त्याच्या धुवाँधार बॅटिंगने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं.
स्पिनर कुमार कार्तिकेयने गिलला कॅच आऊट केलं. गिलने 37 चेंडूत धडाकेबाज 56 धावा केल्या. मात्र, त्यानंतर तो बाद झाला. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने पहिलं षटक टाकलं. शुभमन गिल आणि अर्जुन तेंडुलकर आमनेसामने येताच सोशल मीडिया अॅक्टिव्ह झाला. या सामन्याच्या निमित्ताने सचिन तेंडुलकर यांची कन्या आणि अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकर ट्रेंडमध्ये आली.
म्हणून सोशल मीडिया अॅक्टिव्ह
शुभमन गिल, अर्जुन तेंडुलकर आणि साराचे मीम्स व्हायरल होत आहेत. सारा तेंडुलकर आणि शुममनचं नाव सातत्याने जोडलं जातं. शुभमन आणि सारा एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं जातं. याला ना साराने दुजोरा दिलाय, ना शुभमनने. पण तरीही दोघांची चर्चा सुरूच असते. त्यामुळे शुभमन आणि अर्जुन आमनेसामने येताच सोशल मीडिया अॅक्टिव्ह झाला. काहींनी तर किसी का भाई किसी की जान, अशी प्रतिक्रिया दिली.
Kisi kaa bhaai kisi ki jaan … Will be playing then #GTvsMI #ArjunTendulkar #Shubmangill #SaraTendulkar pic.twitter.com/RQpGHYV7QT
— Tarun Aggarwal (@cool_aggarwal_) April 25, 2023
मीम्सचा पाऊस
नेटकऱ्यांनी साराच्या नावाने ट्विट केले. तर काहींनी मीम्स व्हायरल केले. त्यामुळे सारा अचानक ट्रेंडमध्ये आली. या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओही व्हायरल करण्यात आलाय. यात ईशान किशन गिलला कानशिलात लगावताना दिसत आहे. तर हे पाहून अर्जुन हसताना दिसत आहे.
सोशल मीडिया सेन्सेशन
अर्जुनने आयपीएलमध्ये डेब्यू केला आहे. त्याला चिअर्स करण्यासाठी सारा स्टेडियममध्ये पोहोचली होती. सारा सोशल मीडिया सेन्सेशनही आहे. ती सातत्याने इन्स्टावर अॅक्टिव्ह असते. ती व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. साराने मुंबई आणि लंडनमध्ये शिक्षण घेतलं आहे. ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्याही बातम्या येत असतात. मात्र, त्याचीही कुणी पुष्टी केलेली नाही.