नीता अंबानी यांची रोहित शर्माला पुन्हा कर्णधारपदाची ऑफर?, रोहितने सडेतोड दिले उत्तर…सोशल मीडियावर चर्चा

IPL 2024 : मुंबई इंडियन्सची साथ सोडल्यानंतर रोहित शर्मापुढे तीन पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC), सनराइजर्स हैदराबाद (SRH) किंवा पंजाब किंग्स (PBKS) संघाकडून रोहित शर्मा खेळण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी रोहित कोणत्या संघाकडून दिसणार? यासंदर्भात चर्चा सुरु आहे.

नीता अंबानी यांची रोहित शर्माला पुन्हा कर्णधारपदाची ऑफर?, रोहितने सडेतोड दिले उत्तर...सोशल मीडियावर चर्चा
rohit sharma
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 7:12 AM

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात खराब झालेली आहे. मुंबईला पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. या पराभवानंतर हार्दिक पंड्या याच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबई इंडियन्सने 15 डिसेंबर 2023 रोजी रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन काढून हार्दिक पंड्या याला कर्णधार केले होते. मुंबईच्या सलग तीन सामन्यांत झालेल्या पराभवामुळे संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला पुन्हा कर्णधारपदाची ऑफर दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. परंतु रोहित शर्मा यांनी ही ऑफर नाकारत सडेतोड उत्तर दिले आहे.

काय म्हटले रोहित शर्माने

मीडिया रिपोर्ट्स नुसार,नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला ऑफर दिल्यानंतर रोहितने स्पष्टपणे नकार दिला. तसेच आयपीएलचा हा सीजन संपल्यावर मुंबईकडून खेळणार नसल्याचे नीता अंबानी यांना सांगितले आहे. यामुळे आयपीएल 2025 (IPL 2025)मध्ये रोहित शर्मा नवीन संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. परंतु अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आलेली नाही. आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माने 3 सामन्यांत 69 धावा केल्या आहेत. दरम्यान, या वृत्ताला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सोशल मीडियावर संदर्भातील चर्चा आहे. त्याला कोणताही आधार नाही.

हे सुद्धा वाचा

रोहित शर्मा याच्यापुढे पर्याय काय

रोहित शर्मा 2011 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास सुरुवात केली होती. त्याच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच वेळा विजेतेपद मिळवले. परंतु यावर्षी रोहित शर्माचे कर्णधारपद अचानक काढून घेण्यात आले. मुंबईच्या या निर्णयावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मुंबई इंडियन्यच्या अनेक समर्थकांनी रोहित शर्माला पाठिंबा देण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाला अनफॉलो केले होते. आता मुंबई इंडियन्सची साथ सोडल्यानंतर रोहित शर्मापुढे तीन पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC), सनराइजर्स हैदराबाद (SRH) किंवा पंजाब किंग्स (PBKS) संघाकडून रोहित शर्मा खेळण्याची शक्यता आहे.

आयपीएलमध्ये मुंबई संघाच्या पुढील कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. मुंबईचा चौथा सामना 7 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सच्या संघासोबत होणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.