IPL 2024 : या दोन्ही खेळाडूंसाठी पाण्यासारखा ओतला पैसा, संघामध्ये लागली रस्सीखेच
आयपीएलचा लिलाव आज दुबईमध्ये पार पडत आहे. यावेळी अनेक खेळाडूंवर मोठी बोलली लागली. ज्याचा कोणी विचार ही केला नव्हता. अनेक खेळाडू करोडपती झाले आहेत. काही खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चढाओढ देखील लागलेली दिसली. यामध्ये दोन भारतीय खेळाडू देखील आहेत. ज्यांच्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळाली.
IPL 2024 Auction : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा लिलाव प्रथमच दुबईत होत आहे. लिलावात सर्वच फ्रँचायझी परदेशी खेळाडूंसाठी भरपूर पैसा खर्च करत आहेत. काही भारतीय खेळाडूंवर ही मोठी बोली लागली आहे. त्या दोन भारतीय खेळाडूंमध्ये उमेश यादव आणि शिवम मावी यांच्या देखील समावेश आहे. गुजरात टायटन्सने उमेशला 5 कोटी 80 लाख रुपयात खरेदी केले आहे. तर शिवम मावी याला लखनऊ सुपर जायंट्सने 6 कोटी 40 लाख रुपयांना विकत घेतले.
आयपीएल 2024 च्या लिलावात वेगवान गोलंदाज उमेश यादवची बेस प्राईज 2 कोटी रुपये होती. जेव्हा लिलावात उमेश यादवचे नाव आले तेव्हा सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात त्याला घेण्यासाठी युद्ध सुरू झाले. यानंतर दिल्ली कॅपिटल्सनेही त्यात प्रवेश केला पण शेवटी गुजरातने उमेशला 5 कोटी 80 लाख खरेदी केले. उमेश यादवने आतापर्यंत 141 सामन्यांमध्ये 136 विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी 30.04 होती आणि इकॉनॉमी रेट 8.38 होता.
शिवम मावीवर मोठी बोली
युवा भारतीय वेगवान गोलंदाज शिवम मावीसाठी देखील लिलावात चांगली रस्सीखेच पाहायला मिळाली. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात युद्ध रंगले. मावीची बेस प्राईज 50 लाख रुपये होती. लखनऊने त्याला आपल्या टीमचा भाग बनवण्यासाठी 6 कोटी 40 लाख रुपये खर्च केले. शिवम मावी गेल्या मोसमात गुजरात टायटन्सचा भाग होता पण अनफिट असल्यामुळे एकही सामना खेळू शकला नाही. शिवमच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 32 सामन्यांत 31.4 च्या सरासरीने 30 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय शिवमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 टी-20 सामने खेळताना 7 विकेट्स घेतल्या आहेत.