Virat Kohli: ‘जे पैसे मिळाले, त्यावर विश्वास बसत नव्हता’, विराट कोहलीने उलगडला आयुष्यातला ‘तो’ खास क्षण
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) IPL च्या पहिल्या सीजनमध्ये त्याची कशी निवड झाली? 2008 मधली ड्राफ्ट प्रोसेसची आठवण सांगितली. बंगळुरु स्थित फ्रेंचायजीने विराटची निवड केली होती. त्यावेळी RCB कडून खेळण्यासाठी ‘मला जी रक्कम मिळणार होती, त्यावर माझा विश्वास बसला नव्हता‘ असं विराटने सांगितलं. […]
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) IPL च्या पहिल्या सीजनमध्ये त्याची कशी निवड झाली? 2008 मधली ड्राफ्ट प्रोसेसची आठवण सांगितली. बंगळुरु स्थित फ्रेंचायजीने विराटची निवड केली होती. त्यावेळी RCB कडून खेळण्यासाठी ‘मला जी रक्कम मिळणार होती, त्यावर माझा विश्वास बसला नव्हता‘ असं विराटने सांगितलं. “आयपीएलच्या उद्घाटनाच्या मोसमासाठी जी ड्राफ्ट प्रोसेस झाली, त्यावेळी मलेशियामध्ये मी अंडर 19 संघाचे नेतृत्व करत होतो” असे विराटने सांगितले. आयपीएलच्या ड्राफ्ट पॉलिसीनुसार, प्रत्येक फ्रेंचायजीला अंडर-19 संघातील दोन खेळाडू निवडण्याचा अधिकार होता. 2008 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विराटला 30 हजार अमेरिकन डॉलर्स मोजून विकत घेतलं होतं. त्यावेळी “दिल्ली डेअरडेव्हिल्स म्हणजे आताचा दिल्ली कॅपिटल्स संघही मला घ्यायला इच्छुक होता”, असं विराटने सांगितलं.
त्यांनी विराट ऐवजी प्रदीपवर दाखवला विश्वास दिल्लीने आपली गोलंदाजी धारदार करण्यासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानला संघात घेतलं आणि विराट कोहली RCB कडे गेला. “आम्ही सगळे अंडर 19 वर्ल्डकपसाठी मलेशियामध्ये होतो. ड्राफ्टची प्रोसेस झाली, तो दिवस मला आठवतोय. आम्हाला ज्या किंमतीला विकत घेतल्याची आरसीबीने घोषणा केली. तो क्षण खूप आनंदाचा होता. आम्हाला स्वत:वरच विश्वास बसत नव्हता” असं विराटने सांगितलं. विराट कोहलीसाठी आयपीएलमध्ये कधीच बोली लागली नाही. उद्घटनाच्या मोसमापासून विराट आरसीबीसाठीच खेळतोय.
The RCB Podcast powered by Kotak Mahindra Bank: Trailer
10 episodes, plenty of interesting and never heard before stories about the tournament that made them the superstars they are! (1/n)#PlayBold #WeAreChallengers #TheRCBPodcast pic.twitter.com/MWPQG3IEwH
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) February 1, 2022
आठ वर्ष RCB चं नेतृत्व केलं “दिल्लीचा संघ मला विकत घेण्यासाठी इच्छुक होता, असं मी लोकांकडून ऐकलं. पण त्यांनी प्रदीप सांगवानला टीममध्ये घेतलं. डावखुरा प्रदीप सांगवान त्यावेळी जबरदस्त गोलंदाजी करायचा. आमच्या अंडर 19 टीममधला तो बेस्ट गोलंदाज होता. दिल्लीला आपली गोलंदाजी मजबूत करायची असल्याने त्यांनी प्रदीपला संघात घेण्याचा निर्णय घेतला” असं विराट म्हणाला. कोहलीने आयपीएलमध्ये आरसीबीचं आठ वर्ष नेतृत्व केलं. पण विराटला एकदाही आरसीबीला जेतेपद मिळवून देता आलं नाही. आयपीएलच्या 207 सामन्यांमध्ये विराटने आतापर्यंत 6283 धावा केल्या आहेत.
IPL Auction Virat Kohli recalls getting picked by RCB in 2008 Couldn’t believe the amount I got, it was crazy