पंजाब किंग्सपासून मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी साजरं केलं रक्षाबंधन, सचिन तेंडुलकरनेही जागवल्या बहिणीच्या आठवणी
देशभरात रक्षाबंधनचा सण अगदी उत्साहात पार पडला. क्रिकेट खेळाडूंनी देखील हा भावा-बहिणीच्या नात्याचा सण साजरा केला. आयपीएल संघानी देखील देशवासियांना रक्षाबंधनच्या हटके शुभेच्छा दिल्या.
मुंबई : देशभरात भाऊ बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनचा सण उत्साहात साजरा झाला. फिल्मी जगतासह क्रिकेटपटू देखील या गोड सणाचा आनंद लुटताना दिसले. सोशल मीडियाही रक्षाबंधनाच्या शुभेच्छांनी न्हावून गेले होते. आयपीएल संघ आणि क्रिकेट खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणेनेही खास शुभेच्छा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.
केएल राहुल कर्णधार असलेल्या पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने देखील सर्व खेळाडू रक्षाबंधन साजरे करत असलेले फोटो शेअर करत रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोंमध्ये केएल राहुल, अरश्दीप सिंग, हरप्रित बरड, दर्शन नालकंडे, ईशान पोरेल यांच्यासारखे क्रिकेटपटू बहिंणीसोबत दिसून येत आहेत.
It’s not only a bond of love, but also a thread that binds our life and our hearts. ❤️?#HappyRakshaBandhan2021 #SaddaPunjab #PunjabKings @NalkandeDarshan pic.twitter.com/Ps7BZPbJMf
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) August 22, 2021
आयपीएल संघांचे हटके ट्विट
विविध आयपीएल संघानी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रक्षाबंधनच्या शुभेच्छा पोस्ट केल्या आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सच्या काही खेळाडूंनी बहिणींसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संभाषण करुन रक्षाबंधन साजरे केले आहे. यामध्ये अर्जुन तेंडुलकर, अनमोप्रीत सिंग, युदवीर सिंग, आदित्य तारे हे दिसून येत आहेत. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैद्राबाद, आरसीबी संघानी हटके ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
It’s that time of the year when every sister takes a GRS (Gift Review System) which inevitably turns the decision in her favour ??
Happy #RakshaBandhan to all brothers and sisters ?#YehHaiNayiDilli pic.twitter.com/IrMYndTjeh
— Delhi Capitals (@DelhiCapitals) August 22, 2021
We didn’t even realize we were making memories, we just knew we were having fun playing our favorite game ?
Here’s wishing everyone a very happy #RakshaBandhan#SRH #OrangeArmy #OrangeOrNothing pic.twitter.com/2h6NKnagGd
— SunRisers Hyderabad (@SunRisers) August 22, 2021
The RCB family wishes you a happy Raksha Bandhan! ?
ನಾಡಿನ ಸಮಸ್ತ ಜನತೆಗೆ ರಕ್ಷಾ ಬಂಧನದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು! ?#RakshaBandhan #PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/XLlqFpc8Hn
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 22, 2021
सचिन तेंडुलकरला आली बहिणीची आठवण
महान क्रिकेटपटू सचिनने तेंडुलकरने या महत्त्वाच्या दिवशी बहिणीला आठवत तिच्यासाठी एक खास ट्विट केलं आहे. यामध्ये तो लिहिती की, ‘धन्यवाद ताई, माझ्यासाठी एक खंबीर पाठिंबा बनण्यासाठी. मी भाग्यवान आहे मला तुझ्यासारखी बहिण मिळाली.’
Thanks Tai for always being my pillar of strength. I am very blessed to have a sister like you.
Happy #RakshaBandhan!
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 22, 2021