‘इरफान भाई मला नेहमी सांगायचे, अपना टाइम आयेगा’, टीम इंडियात निवड झालेला ‘तो’ 26 वर्षाचा मुलगा झाला भावूक

कोलकत्त्यामध्ये तीन टी-20 सामने होणार आहेत, तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकाच ठिकाणी वनडे आणि टी-20 सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'इरफान भाई मला नेहमी सांगायचे, अपना टाइम आयेगा', टीम इंडियात निवड झालेला 'तो' 26 वर्षाचा मुलगा झाला भावूक
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 3:19 PM

नवी दिल्ली: वेस्ट इंडिज विरुद्ध (IND vs WI) येत्या सहा फेब्रुवारीपासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. कोलकत्त्यामध्ये तीन टी-20 सामने होणार आहेत, तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकाच ठिकाणी वनडे आणि टी-20 सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माची (Rohit sharma) ही पहिलीच वनडे मालिका आहे. या मालिकेत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. रवी बिष्णोई, दीपक हुड्डा (Deepak Hooda) हे नवीन चेहरे या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. 2018 मध्ये निदाहास ट्रॉफीसाठी दीपक हुड्डाची संघात निवड झाली होती. पण त्याला संधी मिळाली नाही. भारतीय संघात निवड झाल्यानंतर दीपक हुड्डाला माजी ऑलराऊंडर इरफान पठाणचे शब्द आठवले. दीपक हुड्डा बऱ्याचकाळापासून संधीच्या प्रतिक्षेत होता. “माझी निवड होत नसल्याने लोकांना आश्चर्य वाटायचं, पण इरफान पठाण मला नेहमी एकच गोष्ट सांगायचे, दीपक अपना टाइम आयेगा” असे हुड्डाने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.

इरफान आणि युसूफ भाई बरोबर नाळ जुळली “माझी हळूहळू इरफान भाई आणि युसूफ भाईंबरोबर नाळ जुळली. त्यांनी मला शांत रहायला शिकवलं. शांततेची काय ताकत असते, त्याची मला दोघांनी जाणीव करुन दिली. तरुण असताना, तुम्ही अस्थिर असणं, स्वाभाविक आहे. मला काही अपेक्षा नव्हत्या. त्या अस्थिरतेचा माझ्या खेळावर परिणाम होत होता. मी मेहनत करत होतो. गरज नसलेल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत होतो” असे दीपक हुड्डाने सांगितलं.

सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत दीपक हुड्डाने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानकडून खेळताना त्याने सहाडावात 294 धावा केल्या. विजय हजारे करंडक स्पर्धेत सहा सामन्यात 198 धावा केल्या. कर्नाटक विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने शतक झळकावलं होतं.

“मला आठवतय इरफान भाई मला तयारीचं महत्त्व सांगायचे. कोणाकडून कुठलीही अपेक्षा न करता मी तेच करत राहिलो. जीम, नेटमध्ये सराव करायचो. डाएट काटेकोरपणे पाळला. अखेर या सगळ्याचा फायदा झाला” असे दीपकने सांगितले.

“Irfan bhai always told me ‘Apna time aayega'” 26 year old Deepak Hooda India player on ODI call-up for West Indies series

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...