IND vs NZ | विराट कोहली पुन्हा 0 वर बाद, अंपायरच्या निर्णयावर सवाल उपस्थित
विराट कोहली फलंदाजी करण्यास आल्यावर तो केवळ 4 चेंडू खेळला आणि शून्यावर आऊट होत पवेलियनमध्ये परतला. कोहली चौथा चेंडू खेळत असताना तो एकाच वेळेस पॅड आणि बॅटला लागला होता मात्र अंपायरने त्याला आऊट घोषित केलं.
मुंबई : आजपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये इंडिया विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. बऱ्याच दिवसांनी कसोटी क्रिकेटच्या पिचवर परत आलेला विराट कोहली केवळ 4 चेंडू खेळून बाद झाला आहे. पण अंपायरने त्याला ज्या पद्धतीने आऊट दिले, त्या निर्णयावर काही दिग्गज क्रिकेटर्सनी सवाल उपस्थित केले आहेत. तर बऱ्याच दिवसांनी वापसी केल्यानंतर विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना लागली होती. मात्र आज पुन्हा चाहत्यांची निराशा झाली आहे.
अंपायरच्या निर्णयावर सवाल
विराट कोहली फलंदाजी करण्यास आल्यावर तो केवळ 4 चेंडू खेळला आणि शून्यावर आऊट होत पवेलियनमध्ये परतला. कोहली चौथा चेंडू खेळत असताना तो एकाच वेळेस पॅड आणि बॅटला लागला होता मात्र अंपायरने त्याला आऊट घोषित केलं. त्यामुळे कोहलीला तंबूत परतावं लागलं. मात्र अंपायरच्या या निर्णयावर अनेक दिग्गज खेळाडुंनी नाराजी व्यक्त केली आहे, अशावेळी अंपायरने कॉमन सेन्स वापरायला हवा होता, असं मत अनेकंनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे अंपायरच्या या निर्णयावरून सवाल उपस्थित होत आहेत.
विराट कोहलीचा धावांचा दुष्काळ सुरूच
गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीचा खेळही फार चमकदार राहिला नाही, कोहलीची कामगिरी काही दिवसांपासून सुमार झाली आहे. त्याचा फटका टीम इंडियालाही बसत आहे. वानखेडे स्टेडियमवर शेवटचा कसोटी सामना 5 वर्षांपूर्वी खेळला गेला होता. त्यानंतर आज कसोटी क्रिकेट वानखेडे स्टेडियमवर पहायला मिळत आहे. वानखेडेवर खेळले गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याात विराट कोहलीने शानदार खेळ दाखवला होता. तशाच खेळाची अपेक्षा आजही त्याच्याकडून टीम आणि चाहत्यांना होती. मात्र आज पुन्हा विराट कोहली फेल ठरला आहे.