Rahul Dravid: राहुल द्रविड कोच झाल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या? जसप्रीत बुमराह म्हणाला…
विराटने आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती लक्षात घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण संघ त्याच्यासोबत आहे.
Follow us
कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया (Team india) आता 19 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) एकदिवसीय मालिका खेळणार आहे. वनडेचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहला आज टीम इंडियाच्या नव्या मॅनेजमेंटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. रवी शास्त्रींच्या (Ravi shastri) जागी राहुल द्रविड यांची हेड कोचपदी झालेली नियुक्ती खेळाडूंसाठी योग्य आहे का? त्यावर बुमराहने “बदल निश्चित आहे, पण प्रत्येक खेळाडू ही गोष्ट समजतो”
“सगळे आमच्या मदतीसाठी आहेत. टीममध्ये बदल होतात. पण कसं खेळायचं हे सर्वांना माहित आहे. कुठल्याही खेळाडूला कुठलीही समस्या नाही. बदल निश्चित आहे. आम्हा खेळाडूंना आमचे योगदान द्यायचे आहे” असे बुमराह म्हणाला.
“आता टीम इंडिया 2023 वर्ल्डकपच्या दृष्टीने तयारी करत आहे. 2023 वर्ल्डकपसाठी व्हिजन आहे. त्या दृष्टीने टीमची तयारी सुरु होईल” असे बुमराह म्हणाला.
विराटने कर्णधारपद सोडलं, हा त्याचा व्यक्तीगत निर्णय होता, असं जसप्रीत बुमराह म्हणाला. विराटने आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती लक्षात घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण संघ त्याच्यासोबत आहे.
जसप्रीत बुमराह सुद्धा कर्णधारपदासाठी इच्छुक आहे, तसे संकेतच बुमराहने दिले आहेत. भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवायला मिळालं, तर तो माझ्यासाठी एक प्रकारचा सन्मान असेल. पण पदाचा विचार न करता, संघाच्या गरजेननुसार मी माझ्याकाडून योगदान देत राहीन असे बुमराहने म्हटलं आहे.