Eng vs Aus test : फलंदाज म्हणून जबरदस्त पण कर्णधार सुमार, पराभवानंतर जो रुटवर टीका
न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर ब्रँडन मॅकलमने जो रुटच्या कर्णधारपदावर सवाल उपस्थित केले आहेत. त्याच्याकडून उत्तम नेतृत्वाची अपेक्षा होती. मात्र गेल्या काही दिवसात तसे काही दिसून आले नाही. असे मॅकलम म्हणाला आहे.
मुंबई : Ashes सिरीजमध्ये ब्रिसबेन कसोटी सामन्यात इंग्लंडला तब्बल 9 विकेट्सने लाजिरवाणी हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या टीमच्या खेळावर सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रूटही प्रश्नांच्या फेऱ्यात सापडला आहे. त्यामुळे जो रुटवरही अनेक दिग्गज खेळांडूंकडून टीका करण्यात येत आहे. आधीच खराब खेळ आणि आता सगळीकडून होणारी टीका या सर्वांचा सामना आता जो रुट आणि टीम इंग्लंडला करावा लागत आहे. त्यामुळे यातून निघण्याचे आव्हान आता इंग्लंडच्या टीमपुढे असणार आहे.
ब्रँडन मॅकलमकडून टीका
न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर ब्रँडन मॅकलमने जो रुटच्या कर्णधारपदावर सवाल उपस्थित केले आहेत. त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे की, जो रुट एक उत्तम खेळाडू आहे, तो एक उत्तम माणूसही आहे. त्याच्याकडून उत्तम नेतृत्वाची अपेक्षा होती. मात्र गेल्या काही दिवसात तसे काही दिसून आले नाही. जो रुटने एकाच कॅलेंडर बर्षात सर्वात जास्त धावा ठोकल्या आहेत. मात्र तरीही त्याच्या नेतृत्वावर अशा पद्धतीने सावल उपस्थित झाल्याने, याचा निश्चितच परिणाम इंग्लंडच्या क्रिकेटवर होणार आहे. मॅकलमने त्याच्या बॅटिंगचे कौतुक केले आहे, पण त्याच्या नेतृत्वावर टीका केली आहे.
इंग्लंडने पुन्हा एकदा संधी गमावली
इंग्लंडच्या टीमने पहिल्या डावात लवकर हत्यार टाकल्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा विजयाचा चान्स होता, पण त्यांनी तोही गमावला आहे. कसोटीच्या तिसऱ्या दिवसी जो रुट आणि डेविड मलान नाबाद शतकाच्या जवळ पोहोचले होते. मात्र चौथ्या दिवशी त्यांनी लगेच आपल्या विकेट गमावल्या. त्यानंतर इंग्लंडच्या टीमवर ऑस्ट्रिलियाने दबाव बनवायला सुरूवात केली. त्यामुळे इंग्लंडच्या टीमला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. जगातल्या सर्वात प्रतीष्ठेच्या सिरीजपैकी एक सिरीज म्हणून Ashes कडे बघितले जाते. त्यामुळे हे सामने अटीतटीचे होत असतात. मात्र सामने असे एकतर्फी झाल्यावर साहजिकच टीकेचा सामना करावा लागणार.