KL Rahul Injury : टीम इंडियाचे दोन शेर जखमी, दोघांच्या हातात कुबड्या, काय झालं दोघांना?; तीन फोटो पाहिले का?
प्रसिद्ध क्रिकेटपटू केएल राहुल जखमी झाला आहे. त्याची सर्जरीही झाली आहे. त्यानंतरचा त्याचा पहिला फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तो कुबड्या घेऊन चालताना दिसत आहे. जखमी झाल्यामुळे त्याला आयपीएल सामन्यांना मुकावं लागलं आहे.
नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा मोठा अपघात झाला होता. या अपघातातून पंत थोडक्यात बचावला होता. त्यानंतर पंतचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात त्याच्या हातात कुबड्या असल्याचं दिसून आलं होतं. तसाच फोटो आता केएल राहुलचा व्हायरल झाला आहे. सर्जरीनंतरचा केएल राहुलचा हा पहिला फोटो आहे. या फोटोत राहुलच्या हातात कुबड्या आहेत. तोही कुबड्या हातात घेऊन चालताना दिसत आहे. टीम इंडियातील हे दोन शेर जखमी झाले आहेत. त्यांना कुबड्या घेऊन चालताना पाहून त्यांच्या चाहत्यांच्या काळजात धस्स झालं आहे.
आयपीएलच्या 2023 सीजनमध्ये केएल राहुल हा लखनऊन सुपर जायंट्सचा कर्णधार होता. याच सीजनमध्ये एका सामन्यात बाऊंड्रीवर फिल्डिंग करताना राहुल गंभीर जखमी झाला. त्याला प्रचंड मार लागला. त्यांच्या जांघेत जखमा झाल्या. त्यामुळे त्याला आयपीएल सामन्यांना मुकावं लागलं. सुरुवातीला त्याच्या काही जखमा बऱ्या झाल्या. पण काही जखमा अत्यंत गंभीर होत्या. रिपोर्टमध्येही त्याच्या जखमा गंभीर असल्याचं दिसून आल्यानंतर अखेर त्याच्यावर सर्जरी करावी लागली.
तीन फोटो
सर्जरी नंतर राहुलने सोशल मीडियावर त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत राहुल एकटा नाहीये, तर त्याची पत्नी आथियाही त्याच्यासोबत आहे. हे फोटो परदेशातील आहेत. पहिल्या फोटोत राहुल परदेशातील एका रस्त्यावरून चालताना दिसत आहे. त्याच्या हातात कुबड्या आहेत. या कुबड्या घेऊन तो चालताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत त्याच्यासोबत आथिया सुद्धा आहे. तर तिसऱ्या फोटोत राहुल वॉकरच्या सहाय्याने चालताना दिसत आहे.
View this post on Instagram
पंत कुबड्या घेऊन आला
यापूर्वी ऋषभ पंतनेही त्याचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यात तो कुबड्यांच्या सहाय्याने चालताना दिसत होता. पंतने स्वत: तो फोटो व्हायरल केला होता. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या एका सामन्याच्यावेळी पंत हजर होता. दिल्लीच्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी पंत कुबड्या घेऊन आला होता.
पंतचा अपघात झाला होता. त्याच्या कारला भररस्त्यात आग लागली होती. त्यातून तो बचावला होता. यावेळी त्याला प्रचंड मार लागला होता. त्याला उपचारासाठी मुंबईत आणण्यात आलं होतं. आता तो रिकव्हर होत आला आहे. राहुलची प्रकृतीही सुधारत असल्याचं दिसत आहे. मात्र, अजूनही त्याला बरे होण्यासाठी दोन ते तीन महिने लागणार आहेत. जखमी झाल्यामुळे राहुलला आयपीएल सामन्याला मुकावं लागलं आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधूनही त्याला बाहेर जावं लागलं आहे. त्याच्या जागी संघात इशान किशनला स्थान देण्यात आलं आहे.