सुष्मिता सेन ललित मोदीच्या प्रेमात पडली, त्याची एकूण संपत्ती माहित आहे का? विदेशात कसं आयुष्य जगतो, जाणून घ्या….

काल संध्याकाळी एका बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला, ते म्हणजे ललित मोदी (Lalit Modi) आणि सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांचं प्रेम प्रकरण.

सुष्मिता सेन ललित मोदीच्या प्रेमात पडली, त्याची एकूण संपत्ती माहित आहे का? विदेशात कसं आयुष्य जगतो, जाणून घ्या....
lalit modi-sushmita senImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 9:43 AM

मुंबई: काल संध्याकाळी एका बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला, ते म्हणजे ललित मोदी (Lalit Modi) आणि सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांचं प्रेम प्रकरण. ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांना न ओळखणारी लोक फार कमी सापडतील. सुष्मिता सेन एक यशस्वी अभिनेत्री आहे, तर ललित मोदी आयपीएलचा (IPL) जनक. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची कल्पना याच ललित मोदीच्या डोक्यातून जन्माला आली. आज बीसीसीआय, जो बक्कळ पैसा कमावतेय, त्याची सुरुवात या ललित मोदीने करुन दिली. काल ललित मोदीने सोशल मीडियावरुन तो आणि सुष्मिता सेन परस्परांना डेट करत असल्याचं जाहीर केलं. स्वत:च टि्वटरवर ललित मोदीने ही घोषणा केली. ललित मोदी एक उद्योजकही आहे. त्याची एकूण संपत्ती, तो कसं आयुष्य जगतो, या बद्दल जाणून घेऊया.

दोघांचे एकत्र फोटोही पोस्ट केले

ललित मोदी सध्या भारताबाहेर असून तो लंडन मध्ये राहतोय. विदेशात तो आलिशान जीवन जगतोय. सोशल मीडियावर तो सतत आपले फोटो पोस्ट करत असतो. ललित मोदी नुकताच मालदीव मध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेला होता. मालदीव मधून लंडनला परतल्यानंतर ललित मोदीने तो सुष्मिता सेनला डेट करत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याने दोघांचे एकत्र फोटोही पोस्ट केलेत.

केरळात ऑनलाइन लॉटरीचा बिझनेस

ललित मोदी आणि सुष्मिता सेन हे कसं शक्य आहे? असाच प्रश्न अनेकांना पडलाय. पण हे असं घडलय. ललित मोदीकडे प्रचंड पैसा आहे. त्याच्या नेटवर्थ बद्दल बोलायचं झाल्यास, मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याची एकूण संपत्ती 1.5 मिलियन डॉलरच्या घरात आहे. ललित मोदी आणि त्याचं कुटुंब हे बिझनेसच्या दुनियेतील एक मोठं नाव आहे. ललित मोदीने 2002 साली केरळात ऑनलाइन लॉटरीचा बिझनेस सुरु केला होता.

पत्नी ललित मोदीपेक्षा 9 वर्षांनी मोठी

ललित मोदी 2008 ते 2010 पर्यंत आयपीएलचे चेयरमन होते. 2005 ते 2008 दरम्यान ते बीसीसीआय मध्ये सक्रिय होते. या दरम्यान त्याने बीसीसीआयच्या महसूलात मोठी वाढ करुन दिली. ही गोष्ट फार कमी जणांना ठाऊक असेल, मिनाल मोदी हे ललित मोदीच्या पहिल्या पत्नीचं नाव. ती ललित मोदीपेक्षा 9 वर्षांनी मोठी होती. पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. 2018 मध्ये मिनाल यांचं कॅन्सरमुळे निधन झालं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.