Sourav Ganguly Biopic : दादागिरी मोठ्या पडद्यावर झळकणार, गांगुलीकडून स्वत:च्या बायोपिकची घोषणा, ‘हा’ असेल दिग्दर्शक

भारतीय क्रिकेटमधील 'दादा' अर्थात माजी कर्णधार सौरव गांगुलीवर बायोपिक तयार करण्यात येणार आहे. सौरवने नुकतीच त्याच्या ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली.

Sourav Ganguly Biopic : दादागिरी मोठ्या पडद्यावर झळकणार, गांगुलीकडून स्वत:च्या बायोपिकची घोषणा, 'हा' असेल दिग्दर्शक
सौरव गांगुली
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 3:39 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट इतिहासातील एक यशस्वी कर्णधार, उत्कृष्ट दर्जाचा डावखुरा फलंदाज, आपल्या जोशपूर्ण खेळीने प्रतिस्पर्ध्यांना गारद करुन सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा खेळाडू म्हणजे सौरव गांगुली (Sourav Ganguly). भारतात सौरवचे करोडो चाहते असून सर्वंचजण त्याच्या जीवनाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण याबाबतची कोणतीच नेमकी माहिती आतापर्यंत समोर आली नव्हती. पण काही दिवसांपूर्वी गांगुलीने स्वत: न्यूज 18 या वृत्तसंस्थेशी बोलताना आपण आपल्या क्रिकेट जीवनावर बायोपिक करण्यास होकार दिला असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आज त्याने ट्विट करत नेमका कोण दिग्दर्शक हा चित्रपट बनवणार आहे ते ही जाहीर केले आहे.

गांगुलीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “क्रिकेट हे माझे आयुष्य आहे. मला आयुष्यात सर्व आत्मविश्वास हा क्रिकेटमुळे मिळाला. मी ताठ मानेनं पुढ जाऊ शकलो तेही क्रिकेटमुळेच. आता माझ्या आयुष्यावरील चित्रपट लव फिल्म्स मोठ्या पडद्यावर आणणार आहेत. याचा मलाही फार आनंद आहे.”

गांगुलीच्या रोलसाठी ‘हा’ अभिनेता जवळपास निश्चित

सौरव गांगुलीचे मैदानावरील वावरणे अगदी अंग्री यंग मॅनसारखे होते. त्यामुळे त्याच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता भूमिका साकारणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. याबद्दल बोलताना गागुंलीने रणबीर कपूरचे नाव जाहिर केले आहे. तसेच आणखी दोन हिरोंबाबतही विचार होत असल्याचं त्याने सांगितंल. या चित्रपटात गांगुलीची संपूर्ण क्रिकेट कारकिर्द अगदी पदार्पणापासून ते आता बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष होण्यापर्यंत दाखवण्यात येणार आहे.

क्रिकेटपटूंवरील बायोपिक

आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंच्या जीवनावर बायोपिक तयार करण्यात आले असून यातील सुशांत सिंग राजपूतने साकरलेल्या एम एस धोनीचा बायोपिक सर्वांत हिट ठरला आहे. तसेच मोहम्मद अझराऊद्दीनचा इम्रान हाश्मीने साकारलेले बायोपिकही चांगला गाजला. सचिन तेंडूलकरच्या जीवनावरही डॉक्यूमेंटरी तयार करण्यात आली आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या 1983 च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयावर 83 ही फिल्म तयार होत आहे. ज्यात कर्णधार कपिल देवच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. यासोबतच काही दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर चित्रपट येणार असल्याचेही निश्चित झाले आहे. झुलनच्या भूमिकेत अनुष्का शर्मा असणार आहे.

हे ही वाचा :

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

T20 world Cup 2021: भारतीय संघात 5 फिरकी गोलंदाज, इतके फिरकीपटू घेण्यामागे ‘हे’ आहे कारण

T20 world Cup 2021: विराट कोहलीचे 2 एक्के, तरीही टीम इंडियात स्थान नाहीच!

(Luv films and luv ranjan will make biopic on Sourav Ganguly life says ganguly himself)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.