महेंद्रसिंह धोनीच नाही तर त्याच्या सासूने उभारला कोट्यवधींचा व्यवसाय

ms dhoni mother in law | भारतीय क्रिकेट संघाचा माजी धोनीची सासू शीला सिंह धोनीचे प्रॉडक्शन हाऊस धोनी इंटरटेनमेंट लिमिटेडची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. फक्त धोनीची सासूच नाही तर त्याची पत्नी साक्षी ही कंपनी सांभाळत आहे.

महेंद्रसिंह धोनीच नाही तर त्याच्या सासूने उभारला कोट्यवधींचा व्यवसाय
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 8:45 AM

नवी दिल्ली, 17 डिसेंबर | भारतीय क्रिकेट संघात धडाकेबाज खेळाडू म्हणून नाव कमवलेला महेंद्रसिंह धोनी निवृत्तीनंतर व्यवसायात उतरला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सची धुरा सांभाळलेला महेंद्रसिंह धोनी निवृत्तीनंतर व्यवसाय करत आहे. कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय धोनी करत आहे. परंतु फक्त धोनीच नाही तर त्याची सासूही मोठा उद्योग सांभाळत आहे. धोनीची सासू शीला सिंह प्रॉडक्शन हाऊस धोनी इंटरटेनमेंट लिमिटेडची (Dhoni Entertainment Limited) मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. फक्त धोनीची सासूच नाही तर त्याची पत्नी साक्षी ही कंपनी सांभाळत आहे. साक्षी या कंपनीत संचालक आहे. आई आणि मुलगी ही कंपनी सांभाळत असून त्याची उलाढाल 800 कोटींपेक्षा जास्त आहे.

800 कोटींची ही कंपनी

शीला सिंह कंपनीच्या प्रमुख म्हणून पहिल्यांदाच भूमिका पार पाडत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी वेगाने व्यवसाय वाढवत आहे. कंपनीने मल्टी मिलियन डॉलरचा बेस आहे. कंपनीकडे अनेक नवीन प्रोजेक्ट आले आहे. मुलगी आणि आई चालवत असलेली या कंपनीची एकूण संपत्ती 800 कोटींपर्यंत गेली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला धोनी इंटरटेनमेंट लिमिटेड या कंपनीने तामिळ फिल्म उद्योगात पहिला चित्रपट बनवला आहे. लेट्स गेट मॅरिड (LGM) हा चित्रपट तयार केला आहे. त्याचे दिग्दर्शन रमेश थमिलमानी यांनी केले आहे. परिवारीक कथा असणारा हा चित्रपट अॅमझॉन प्राइम व्हि़डिओच्या OTT प्लेटफॉर्मवर आहे.

हे सुद्धा वाचा

चूल आणि मूलपर्यंत मर्यादीत होत्या शीला सिंह

शीला सिंह याचे पती आरके सिंह आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळात महेंद्रसिंह धोनी याचे वडील पानसिंह यांच्यासोबत कनोईग्रुप ‘बिनागुरी टी कंपनी’त काम करत होते. त्यावेळी शीला सिंह फक्त एक गृहिणी म्हणून काम करत होती. चूल आणि मुल सांभाळणारी महिला वयाच्या ६० नंतर ८०० कोटीचा उद्योग सांभाळत आहे. विशेष म्हणजे हा उद्योग सातत्याने वाढत आहे. यामुळे शिला सिंह कंपनीची जबाबदारी यशस्वी पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.