MI vs DC Live Score, IPL 2021 : आधी गोलंदाजांची कमाल, मग श्रेयस-अश्विनची चिवट फलंदाजी, चुरशीच्या सामन्यात दिल्लीची मुंबईवर मात
आधी गोलंदाजांची टिच्चून गोलंदाजी, त्यानंतर श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि रवीचंद्रन अश्विनच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर अत्यंत चुरशीच्या सामन्यात दिल्लीने मुंबईवर विजय मिळवला.
IPL 2021 स्पर्धेत आज शारजाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 46 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये खेळवला. तब्बल 5 वेळा आयपीएलचा खिताब पटकावलेला मुंबईचा संघ यंदा प्लेऑफमध्ये जाण्यापासून वंचित राहिल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण आजच्या निर्णायक सामन्यात दिल्लीने मुंबईवर मात केली आहे. आयपीएलमध्ये आज उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्लीने मुंबईचा 4 गडी राखून पराभव केला.
दिल्लीने याआधीच प्लेऑफचं तिकीट कन्फर्म केलं होतं, मात्र आजच्या विजयामुळे दिल्लीचं टॉप 2 मधलं स्थान अधिक बळकट झालं आहे. तर मुंबईने आजचा सामना गमावल्याने त्यांच्या प्लेऑफच्या शक्यता कमी झाल्या आहेत. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईला त्यांनी अवघ्या 129 धावांत रोखण्याचं काम केलं.
त्यानंतर मुंबईने दिलेलं 130 धावांचं लक्ष्य दिल्लीच्या फलंदाजांनी चार गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केलं. दिल्लीकडून या सामन्यात श्रेयस अय्यरने चिवट फलंदाजी करत निर्णायक 33 धावांची खेळी केली. त्याला आधी रिषभ पंतने 26 धावा करुन आणि अखेरच्या षटकात रवीचंद्रन अश्विने 20 धावा करुन चांगली साथ दिली.
मुंबईच्या गोलंदाजांनीदेखील या सामन्यात नेहमीप्रमाणे चांगली गोलंदाजी केली. मुंबईकडून या सामन्याट ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कृणाल पंड्या आणि नॅथन कुल्टर नाईलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
मुंबईचा पहिला डाव
या डावात दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करु दिली नाही. मुंबईकडून या डावात सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. याच्याव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाला 20 पेक्षा जास्त धावा जमवता आल्या नाहीत. दिल्लीकडून आवेश खान आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. नॉर्खिया आणि रवीचंद्रन अश्विनला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
LIVE Cricket Score & Updates
-
अश्विनचा षटकार, दिल्लीची मुंबईवर मात
अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार लगावत अश्विनने मुंबईच्या हातातली मॅच हिसकावली
-
दिल्लीचा सहावा झटका, शिमरन हेटमायर 15 धावांवर बाद
जसप्रीत बुमराहने मुंबईला मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे. बुमराने आक्रमक शिमरन हेटमायरला रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. दिल्ली (93/6)
-
-
दिल्लीचा अर्धा संघ तंबूत, अक्षर पटेल 9 धावांवर बाद
दिल्लीने पाचवी विकेट गमावली आहे. ट्रेंट बोल्टने अक्षर पटेलला पायचित केलं. (दिल्ली 77/5)
-
दिल्लीचा चौधा गडी माघारी, रिषभ पंत 26 धावांवर बाद
दिल्लीने चौथी विकेट गमावली आहे. जयंत यादवने रिषभ पंतला हार्दिक पंड्याकरवी झेलबाद केलं. (दिल्ली 58/4)
-
दिल्लीला तिसरा झटका, स्टीव्ह स्मिथ 9 धावांवर बाद
दिल्लीने तिसरी विकेट गमावली आहे. नॅथन कुल्टर नाईलने स्टीव्ह स्मिथला 9 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (दिल्ली 30/3)
-
-
पंतचा हल्लाबोल
तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ऋषभ पंतने शानदार षटकार लगावला. (दिल्ली 21/2)
-
दिल्लीला दुसरा झटका, पृथ्वी शॉ 6 धावांवर बाद
दिल्लीने दुसरी विकेट गमावली आहे. कृणाल पंड्याने पृथ्वी शॉला 6 धावांवर असताना पायचित केलं. (दिल्ली 15/2)
-
दिल्लीची आश्वासक सुरुवात, शॉ-धवनकडून हल्लाबोल
130 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली आहे. पहिल्या षटकात पृथ्वी शॉने चौकार वसूल केला, तर दुसऱ्या षटकात शिखर धवनने जयंत यादवच्या गोलंदाजीवर शानदार षटकार लगावला.
-
मुंबईचा आठवा गडी माघारी, जयंत यादव 11 धावांवर बाद
मुंबईने आठवी विकेट गमावली आहे. रवीचंद्रन अश्विने जयंत यादवला स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केलं. (मुंबई – 122/7)
-
मुंबईचा सहावा फलंदाज माघारी, हार्दिक पंड्या 17 धावांवर बाद
मुंबईने सहावी विकेट गमावली आहे. आवेश खानने हार्दिक पंड्याला 17 धावांवर असताना त्रिफळाचित केलं.
-
मुंबई इंडियन्सला मोठा झटका, कायरन पोलार्ड 6 धावांवर बाद
मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. नॉर्खियाने कायरन पोलार्डरा (6) त्रिफळाचित करत मुंबईला अडचणीत टाकले आहे. (मुंबई 87/5)
-
मुंबईला चौथा धक्का, सौरभ तिवारी 15 धावांवर बाद
मुंबईने चौथी विकेट गमावली आहे. अक्षर पटेलने सौरभ तिवारी 15 धावांवर बाद रिषभ पंतकरवी झेलबाद केलं. (मुंबई 80/4)
-
मुंबईला तिसरा धक्का, सूर्यकुमार यादव 33 धावांवर बाद
मुंबईने तिसरी विकेट गमावली आहे. अक्षर पटेलने सूर्यकुमार यादवला रबाडाकरवी झेलबाद केलं. (मुंबई 68/3)
-
मुंबईला दुसरा झटका, क्विंटन डीकॉक 19 धावांवर बाद
मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. अक्षर पटेलने क्विंटन डीकॉकला 19 धावांवर नॉर्खियाकरवी झेलबाबाद केलं.
-
पॉवरप्लेमध्ये मुंबईच्या 35 धावा
मुंबईचा संघ पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा करण्यात सातत्याने अपयशी ठरतोय. आज त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली, मुंबईने 6 षटकात केवळ 35 धावा केल्या. विशेष म्हणजे, मुंबईने यात एक विकेटदेखील गमावली आहे.
-
मुंबईला पहिला झटका, रोहित शर्मा 7 धावांवर बाद
मुंबई इंडियन्सने दुसऱ्याच षटकात मोठी विकेट गमावली आहे. आवेश खानने रोहित शर्माला 7 धावांवर रबाडाकरवी झेलबाद केलं. (मुंबई 7/1)
-
मुंबईचे सलामीवीर रोहित-डीकॉक मैदानात
मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक मैदानात दाखल झाले आहेत. पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माचा चौकार.
-
मुंबई इंडियन्सची प्लेइंग XI
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, नॅथन कुल्टर-नाईल, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
-
दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग XI
पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार), शिमरन हेटमायर, स्टीव्ह स्मिथ, अक्षर पटेल, आर. अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, एनरिच नॉर्खिया
-
नाणेफेक जिंकून दिल्लीचा गोलंदाजी करण्याचा निर्णय
दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
? Toss Update from Sharjah ?@DelhiCapitals have elected to bowl against @mipaltan. #VIVOIPL #MIvDC
Follow the match ? https://t.co/Kqs548PStW pic.twitter.com/ERJAloH0vF
— IndianPremierLeague (@IPL) October 2, 2021
Published On - Oct 02,2021 3:17 PM