Mohammed Shami IPL 2022 Auction: मोहम्मद शमीसाठी चार टीम भिडल्या, नवख्या गुजरात टाइटन्स मारली बाजी

Mohammed Shami Auction Price: मोहम्मद शमी गेल्या काही सीझनमध्ये पंजाब किंग्ज या टीमकडून खेळत होता. या सीझनमध्ये तो गुजरात टाइटन्सकडून खेळेल.

Mohammed Shami IPL 2022 Auction: मोहम्मद शमीसाठी चार टीम भिडल्या, नवख्या गुजरात टाइटन्स मारली बाजी
मोहम्मद शमी
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 1:56 PM

नवी दिल्ली : आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction) टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याचा समावेश लिलावाच्या पहिल्या यादीत करण्यात आला होता. मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टाइटन्स (Gujarat Titans) ने मोहम्मद शमीला खरेदी केला आहे. गुजरात टायटन्सनं 6.25 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. मोहम्मद शमी साठी IPL Auction मध्ये चार टीम भिडल्या, अखेर गुजरातने बाजी मारली. शमी ज्या टीममध्ये असतो त्या टीमचा तो प्रमुख गोलंदाज समजला जातो. ऑक्शनमध्ये मोहम्त शमीवर गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जाएंटस आणि केकेआरनं बोली लावली. मोहम्मद शमीनं त्याची बेस प्राईस दोन कोटी रुपये ठेवली होती. आयपीएलमध्ये शमीनं 79 मॅच खेळल्या आहेत त्यामध्ये 79 विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरी 30.40 इतकी आहे. तर, त्याची इकॉनॉमी 8.62 इतकी राहिली आहे.

पंजाब किंग्जसाठी बॉलिंग

मोहम्मद शमी 2019 मध्ये पंजाब किंग्ज या टीममध्ये आला होता. 2019 च्या सिझनमध्ये मोहम्मद शमीनं 19 विकेट घेतल्या होत्या. तर, त्याने 14 मॅच खेळल्या होत्या. तर, 2020 च्या सीझनमध्ये मोहम्मद शमीनं 14 मॅचमध्ये 20 विकेट घेतल्या होत्या. गेल्या सिझनमध्ये 19 विकेट घेऊनही पंजाबनं त्याला रिटेन न केल्यानं आश्चर्याचा धक्का बसला होता.

कोलकाता दिल्ली पंजाब असा प्रवास

मोहम्मद शमीची आयपीएलमध्ये 2011 ला एंट्री झाली. मात्र, त्याला 2013 मध्ये एकही सामना खेळता आली नव्हती. 2013 मध्ये त्यानं तीन मॅच खेळल्या आणि केवळ एक विकेट घेतली. 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं रिटेन केलं. त्या सिझनमध्ये शमीनं 12 मॅच खेळल्या आणि 7 विकेट घेतल्या. तो सिझन कोलकाता नाईट रायडर्सनं जिकंला होता. 2015 मध्ये दुखापतीमुळं तो खेळू शकला नव्हता. 2016 मध्ये मोहम्मद शमी दिल्ली डेअरडेविल्स या टीमकडून आयपीएलमध्ये बोलिंग केली. पुढचे तीन सिझन तो दिल्लीसाठी खेळला. 2019 मध्ये मोहम्मद शमीला पंजाबनं घेतलं होतं.

इतर बातम्या :

Trent Boult IPL 2022 Auction: ट्रेंट बोल्टसाठी तीन संघांची टक्कर, मुंबईनं गमावलं, बोल्ट कुणासाठी विकेट घेणार?

IPL Auction 2022 | श्रेयससाठी कोलकाताने मोजले तब्बल 12.25 कोटी! पाहा कुणाची किती कोटींची बोली?

Mohammed Shami IPL 2022 Auction Gujarat Titans buys at auction price 6.25 Crore rupees

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.