हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाची पहिली प्रतिक्रिया, व्हिडिओ आला समोर

Hardik Pandya Divorce: हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यात घटस्फोट झाला तर हार्दिकला किती संपत्ती द्यावी लागणार आहे, यासंदर्भाच चर्चा सुरु आहे. त्यानुसार हार्दिक पांड्या याला त्याचा संपत्तीचा 70 टक्के हिस्सा पोटगी म्हणून द्यावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाची पहिली प्रतिक्रिया, व्हिडिओ आला समोर
Follow us
| Updated on: May 26, 2024 | 10:23 AM

आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि बॉलीवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोट होणार असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नताशाने तिच्या इंस्टाग्रामवरुन पांड्या नाव काढल्यानंतर सोशल मीडियावर या चर्चा जोरात सुरु झाल्या. तसेच नताशा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या समर्थन करणाऱ्या लोकांमध्ये दिसली नाही. यामुळे दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चांवर जेव्हा नताशाला प्रश्न विचारण्यात आला, त्यावर तिने मोजक्या शब्दांत उत्तर दिले आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

नताशाला हार्दिक पांड्यासोबत घटोस्फोटच्या अफवासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नताशाने मोजक्या शब्दांत उत्तर दिले. ”थँक्यू व्हेरी मच”, असे उत्तर देत नताशा त्या ठिकाणावरुन निघून गेली. इंस्टाबॉलीवूड नावाच्या इंस्टा हँडलने हा व्हिडियो पोस्ट केला आहे. दरम्यान शनिवारी नताशा अभिनेत्री दिशा पटानी हिचा कथित ब्यॉयफ्रेंड एलेक्जेंडर एलेक्सलिक हिच्यासोबत सार्वजनिक जागांवर फिरताना दिसली. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

नताशा शनिवारी एलेक्जेंडरसोबत अपार्टमेंटमधून बाहेर पडली. त्यानंतर फोटोग्राफरांकडून विनंती केली गेल्यावर तिने एलेक्सलिकसोबत फोटो काढू दिले. हार्दिक पांड्यासोबत सुरु असलेल्या वादानंतर नताशा एलेक्जेंडर फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होऊ लागले आहे.

नताशाला द्यावी लागणार ७० टक्के संपत्ती?

हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यात घटस्फोट झाला तर हार्दिकला किती संपत्ती द्यावी लागणार आहे, यासंदर्भाच चर्चा सुरु आहे. त्यानुसार हार्दिक पांड्या याला त्याचा संपत्तीचा 70 टक्के हिस्सा पोटगी म्हणून द्यावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे. हार्दिक पांड्या याला आयपीएल, बीसीसीआयकडून मानधन मिळते. तसेच अनेक जाहिरातीमधून त्याला उत्पन्न मिळते. दरम्यान, हार्दिक पांड्याचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये त्याने आपली बरीच संपत्ती आईच्या नावावर असल्याचे म्हटले आहे. गाडी, घर त्याने आईच्या नावावर घेतले आहे. भविष्यात 50 टक्के कोणालाही देऊ नका, असे हार्दिक पांड्या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.