ICC T20 World Cup टीम जाहीर, बाबर आझम कर्णधार, भारताच्या एकाही खेळाडूला स्थान नाही
आयसीसीने नुकतीच त्यांच्या T20 World Cup संघांची घोषणा केली आहे. बाबर आझमला (Babar Azam) आयसीसी टी-20 विश्वचषक संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
दुबई : आयसीसीने नुकतीच त्यांच्या T20 World Cup संघांची घोषणा केली आहे. बाबर आझमला (Babar Azam) आयसीसी टी-20 विश्वचषक संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. या संघात टीम इंडियाच्या एकाही क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आलेला नाही, भारतासोबत श्रीलंकेच्या खेळाडूंनाही 12 सदस्यीय संघात स्थान मिळालेलं आहे. भारतीय संघ या स्पर्धेच्या (T20 World Cup 2021) सुपर-12 फेरीतूनच बाहेर पडला. भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाचा पराभव केला. दरम्यान, विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 77 धावांची खेळी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शलाही संघात स्थान मिळालेले नाही. (No Indian included in ICC’s Team of Tournament; Babar Azam named captain)
ज्युरी सदस्यांनी कोणत्याही भारतीय खेळाडूला संघात स्थान दिले नाही. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करम, वेगवान गोलंदाज एनरिच नोर्किया, श्रीलंकेचा फलंदाज चरित असलंका, लेगस्पिनर वानिंदू हसरंगा या दोघांना आयसीसीच्या संघात स्थान मिळाले आहे. चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि उपविजेत्या न्यूझीलंडच्या खेळाडूंचीही संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे तर, सलामीवीर आणि टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू डेव्हिड वॉर्नर, लेगस्पिनर अॅडम झाम्पा आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांना संघात स्थान मिळाले आहे.
हसरंगाच्या सर्वाधिक विकेट तर बाबरच्या सर्वाधिक धावा
इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलर आणि अष्टपैलू मोईन अली यांच्याशिवाय न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनेही संघात स्थान मिळवले आहे. वानिंदू हसरंगा या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे तर बाबर बझमने सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत आहेत. ज्युरी सदस्य आणि वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप म्हणाले की, “प्रत्येक देशाच्या संघ निवडीप्रमाणे या संघाबाबतही चर्चा केली जाईल. पॅनेल अशा चर्चेचा आदर करते. अशा स्पर्धात्मक टूर्नामेंटमधून संघ निवडणे अत्यंत अवघड होते. संघ निवडीचा मुख्य आधार होता तो म्हणजे सुपर-12 ते अंतिम फेरीपर्यंतचे सामने.”
आयसीसी टी-20 विश्वचषक संघ
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), जोस बटलर (इंग्लंड), बाबर आझम (कर्णधार, पाकिस्तान), चरित असलंका (श्रीलंका), एडन मार्करम (दक्षिण आफ्रिका), मोईन अली (इंग्लंड), वानिंदू हसरंगा (श्रीलंका), अॅडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया), जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), एनरिच नोर्किया (दक्षिण आफ्रिका). 12 वा खेळाडू – शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान).
Moeen Ali & @josbuttler named in the @ICC team of the men’s @T20WorldCup. @babarazam258 is the captain of a side including 3 players from champions #Australia. #bbccricket #T20WorldCupFinal pic.twitter.com/INn2zvTYVp
— Test Match Special (@bbctms) November 15, 2021
इतर बातम्या
विश्वचषक स्पर्धा संपली, आता रंगणार भारत-न्यूझीलंड सामने, संपूुर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!
बांग्लंदेशविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 4 खेळाडूंना बाहेरचा रस्ता
हार्दीक पंड्याच्या अडचणी वाढल्या, संघातून बाहेर झाल्यानंतर आता 5 कोटींची 2 घड्याळंही जप्त
(No Indian included in ICC’s Team of Tournament; Babar Azam named captain)