World Cup 2023 च्या मुहूर्तावर व्हायरल होतोय एक खूप जुना व्हिडीओ, सचिन तेंडुलकर म्हणतो…

टीम इंडिया वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये पोहचलीये. ही फायनलची मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणारे. आता फायनलची मॅच म्हणजे देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. भारतात सणवार आणि क्रिकेटची मॅच खूप धडाकेबाज पद्धतीने साजरे केले जातात.

World Cup 2023 च्या मुहूर्तावर व्हायरल होतोय एक खूप जुना व्हिडीओ, सचिन तेंडुलकर म्हणतो...
sachin tendulkar viral video 2011 world cup
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 6:28 PM

अहमदाबाद: टीम इंडिया वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये पोहचलीये. ही फायनलची मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणारे. आता फायनलची मॅच म्हणजे देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. भारतात सणवार आणि क्रिकेटची मॅच खूप धडाकेबाज पद्धतीने साजरे केले जातात. तुम्ही जर भारताची 2011 ची वर्ल्ड कप मॅच पाहिली असेल तर तुम्हाला त्यावेळी लोकांनी कसा जल्लोष केला होता हे चांगलं आठवत असेल. वर्ल्ड कपचा माहोल वेगळाच असतो. आजची ऑस्ट्रेलियासोबतची मॅच सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कालपासून सोशल मीडियावर मिम्सने नुसता धुमाकूळ घातलाय. यात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ मॅच जिंकल्यानंतरचा आहे. २०११ साली जेव्हा भारत विश्वचषक जिंकला होता तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.

भारताच्या विजयाचं सेलिब्रेशन

हा व्हिडीओ सचिन तेंडुलकरच्या मुलाखतीचा आहे. स्काय स्पोर्ट्सने सचिन तेंडुलकरची एक मुलाखत घेतली होती तेव्हा या मुलाखतीत दाखवला गेलेला हा व्हिडीओ आहे. यात सचिन सांगतो, 2011 ची मॅच त्याच्यासाठी खूप खास होती कारण 1983 नंतर पहिल्यांदाच भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. हा वर्ल्ड कप जिंकला आणि सगळे भारतीय रस्त्यावर उतरले, सगळीकडे जल्लोष, रस्त्यावर उतरून लोकांनी भारताच्या विजयाचं सेलिब्रेशन केलं.

तेव्हाचं स्टेडियमचं दृश्य

हा व्हायरल व्हिडीओ बघा, या व्हिडीओमधील काही दृश्य बघून तुम्हाला 2011 चं वर्ष आठवेल. कसा त्यावर्षी भारताने विश्वचषक जिंकला होता, कसं कोहलीने मॅच जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलून घेतलं होतं. या व्हिडीओमध्ये तुम्हाला तेव्हाचं स्टेडियमचं दृश्य सुद्धा पाहायला मिळेल. हा व्हिडीओ खूप लोकांनी लाईक केलाय, अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्यात. @Panchih0 नावाच्या आयडीसह हा शानदार व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आलाय.

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.