AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शोएब अख्तरचा वेग अजूनही तसाचं, मैदानावर पुन्हा उतरत भेदक गोलंदाजी, पाहा VIDEO

क्रिकेटच्या जगतातील सर्वात वेगवान चेंडू ज्याच्या नावावर आहे, त्या पाकिस्तानच्या शोएब अख्तरने पुन्हा एकदा मैदानावर उतरत गोलंदाजीचा जलवा दाखवला आहे.

शोएब अख्तरचा वेग अजूनही तसाचं, मैदानावर पुन्हा उतरत भेदक गोलंदाजी, पाहा VIDEO
शोएब अख्तर
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 6:19 PM
Share

मुंबई: पाकिस्तान क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू शोएब अख्तर याला क्रिकेट जगतातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून संबोधलं जातं. त्याच कारणही तसंच आहे. तब्बल 161.3 km/hr च्या वेगात चेंडू शोएबने टाकला असून हा आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू आहे. दरम्यान 46 वर्षीय शोएब सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी आजही त्याचा वेग तसाच आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून शोएबच्या गोलंदाजीची झलक पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ शोएब अख्तरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. शोएब इस्लामाबाद क्लबच्या नवीन मैदानावर गोलंदाजी करताना दिसत आहे. त्याता बोलिंग अॅक्शन अजूनही तशीच असल्याने इतक्या काळानंतरही शोएबच्या बोलिंगचा वेग तसाचं असल्याचं दिसून येत आहे.

चाहत्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा

शोएबने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. अनेकजण त्याला तू दिग्गज आहेस. तसंच अशा अजूनही व्हिडीओ अपलोड करा अशा कमेंट्स करत आहेत. काहींनी हा व्हिडीओपाहून बालपणीचे दिवस आठवले अशा कमेंट्सही केल्या आहेत.

शोएबची कारकिर्द थोडक्यात

2011 साली अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या शोएबचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम अजूनही त्याच्याच नावावर आहे. त्याने पाकिस्तानसाठी एकूण 46 कसोटी, 163 वनडे आणि 15 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 178, वनडेमध्ये 247 आणि टी-20 मध्ये 19 विकेट्स आहेत.

हे ही वाचा

IPL 2021: राजस्थानविरुद्ध तुफानी अर्धशतकानंतर बास्केटबॉल कोर्टमध्येही इशानची कमाल, पाहा VIDEO

T20 WC : भारत टी-20 विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार, मात्र ‘या’ तीन संघांचं तगडं आव्हान

IPL 2021 : जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर सगळेच संघ फेल, ‘कंजुषी’चे रेकॉर्ड मोडित

(Pakistan and worlds fast bowler shoaib akhtars new Bowling video went viral)

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.