‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल!

पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने सामना सुरु होण्यासाठी 20 मिनिटं शिल्लक असताना मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंग्लंडनेही आगामी पाकिस्तान दौरा रद्द केला. त्यानंतर या सर्वाचं खापर पाकिस्तानने भारतावर फोडलं आहे.

'न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात', पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल!
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 10:13 PM

कराची : काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सीरिज रद्द करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने ही  सीरिज रद्द केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर इंग्लंड क्रिकेटनेही आगामी पाकिस्तानचा दौरा रद्द केला. दरम्यान या दोन्ही संघाकडून झालेल्या नाचक्कीचं खापर पाकिस्तानने भारतावर फोडलं आहे. पाकिस्तानचे सूचना मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhary) यांनी न्यूझीलंड संघाला दौरा रद्द करण्यासाठी धमकीचा ईमेल भारतातून आला होता. असा धक्कादायक आरोप केला आहे.

श्रीलंकन खेळाडूंवप झालेल्या गोळीबारानंतर कोणताच संघ पाकिस्तानात दौऱ्यासाठी जात नव्हता. मात्र मागील काही वर्षात पुन्हा काही संघ पाकिस्तानमध्ये दौऱ्यासाठी जाण्यास सुरुवात झाली होती. श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंड संघही पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता. यावेळी दोघांमध्ये 3 वनडे आणि 5 टी-ट्वेंटी सामने खेळवण्यात येणार होते. वनडे सीरिजने या दौऱ्याला सुरुवात होणार होती. त्यातील पहिला वनडे सामना 17 सप्टेंबर रोजी सुरु होत असताना टॉस होण्याच्या 20 मिनिटांआधीच हा सामना रद्द करण्यात आला. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानच्या सूचना मंत्र्यांनी भारतावर सर्व खापर फोडलं.

पाकिस्तानचं म्हणणं काय?

पाकिस्तानचे सूचना मंत्री फवाद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी ऑगस्ट महिन्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा दहशतवादी एहसानुल्लाह एहसनच्या नावाने एक धमकीची पोस्ट न्यूझीलंडला आली होती. त्यानंतरही ते दौरा खेळण्यासाठी आले. पण त्यानंतर आणखी एक धमकीचा मेल आला. यामध्ये हम्जा आफ्रिदी नावाच्या आयडीचा वापर करण्यात आला होता. पण हा मेल भारतातील महाराष्ट्रातील एका उपकरणावरून पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांच्या तपासात समोर आल्याचं चौधरी म्हणाले.

पुढे सांगताना चौधरी म्हणाले, ”हा मेल पाठवताना लोकेशन सिंगापूर दाखवण्यात आलं होतं. पण संबधित उपकरणावरील अधिक मेल आयडी हे भारतातील असून तपासांती हा मेल भारतातून आल्याचचं समोर आलं. दरम्यान भारताने असं वागण दुर्दैवी आहे. या खेळाविरुद्ध असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने यावर लक्ष देऊन योद्य कारवाई करायला हवी.”

ऑस्ट्रेलियाचा दौराही धोक्यात

न्यूझीलंड दौरा रद्द झाल्याने इंग्लंडच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मागील बराच काळापासून आशा असणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं भविष्यही धोक्यात आलं आहे.  या दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी20 अशा सर्व प्रकारचे सामने खेळवण्यात येणार होते. ही मालिका फेब्रुवारी, मार्च 2022 दरम्यान खेळवली जाणार होती. ऑस्ट्रेलिया संघ जवळपास  24 वर्षांपासून पाकिस्तान दौऱ्यावर गेलेली नाही.

हे ही वाचा

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याचा IPL ला फायदा, चेन्नई सुपरकिंग्सचा संघ सर्वात आनंदी

पाकिस्तानची नाचक्की! टॉसच्या अर्धा तास आधी न्यूझीलंडकडून सा्मना रद्द, पाकिस्तानविरोधात न खेळातच तातडीनं मायदेशी परतणार, नेमकं कारण काय?

विराट आणि बीसीसीआयमध्ये तणाव, माजी मुख्य निवडकर्ता संदीप पाटील यांचा खुलासा

(Pakistan blame india for new zealand tour cancelation says Threatning mail generated from india)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.