बांग्लंदेशविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 4 खेळाडूंना बाहेरचा रस्ता

टी20 विश्वचषकात अप्रतिम कामिगिरी नंतरही सेमीफायनलमध्ये बाबर आजमच्या पाकिस्तान संघाला पराभव पत्करावा लागला आहे. आता पाकिस्तानचा संघ नव्या आव्हानासाठी सज्ज झाल आहे.

बांग्लंदेशविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 4 खेळाडूंना बाहेरचा रस्ता
पाकिस्तान क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 9:37 PM

कराची: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) चांगल्या प्रदर्शनानंतरही पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याने चॅम्पियन होण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. दरम्यान आता पाकिस्तानचा संघ बांग्लादेशविरुद्धच्या (Pakistan vs Bangladesh) कसोटी सामन्यांसाठी सज्ज झाला असून नुकताच संघ देखील जाहीर करण्यात आला. यावेळी विश्वचषकता अप्रतिम प्रदर्शन करणारा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याशिवाय लेग स्पिनर यासिर शाह आणि शाहनवाज दहानी यांनाही संघात घेण्यात आलेलं नाही. पाकिस्तानने नुकतीच 20 सदस्यीय टीमची घोषणा  केली आहे. यात इमाम-उल-हक आणि बिलाल आसिफ यांचं संघात पुनरागमन झालं आहे. कामरान गुलामलाही संधी दिली आहे.

पाक क्रिकेटचे मुख्य निवडकर्ते मोहम्मद वसीम यांनी बिलालच्या जागी यासिरला संधी दिली आहे. यासिरची अंगठ्याची जखम बरी होत असून तो सध्या पाकच्या प्रथम श्रेणी क्रिकेट टूर्नामेंटमध्ये कायद-ए-आजम ट्रॉफीमध्ये खेळत नाही आहे. पण तो लवकरच बरा होऊ बांग्लादेशविरुद्ध नक्कीच खेळणार आहे. तर ऑफ स्पिनर साजिद खान आणि लेग स्पिनर जाहिद महमूद यांनाही संघात संधी मिळाली आहे. तर युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी हा डेब्यू करणार आहे.

असं आहे वेळापत्रक

पहिला सामना, 26 ते 30 नोव्हेंबर,  चटगांव.

दुसरा सामना, 4 डिसेंबर ते 8 डिसेंबर, ढाका.

बांग्लादेश टेस्ट मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ: बाबर आजम (कप्तान), मोहम्मद रिजवान (उप-कर्णधार), अब्दुल्ला शफीक, आबिद अली, अजहर अली, बिलाल आसिफ, फहीम अशरफ, फवाद आलम, हसन अली, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, मोहम्मद अब्बास, मोहम्मद नवाज, नसीम शाह, नौमान अली, साजिद खान, सरफराज अहमद, सऊद शकील, शाहीन शाह अफरीदी, जाहिद महमूद.

इतर बातम्या

T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली

Video: विश्वचषक जिंकताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच अजब सेलिब्रेशन, बुटातून घेतला ड्रिंक्सचा आस्वाद, नेमकं कारण काय?

भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सोडताच रवी शास्त्रींकडे नवी कामगिरी, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

(Pakistan Cricket board Announced Pakistan test squad for bangladesh test series)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.