AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी तोरा मिरवला पण शेवटी वठणीवर आले, पाकड्यांच्या जर्सीवर आता सन्मानाने दिसतोय ‘इंडिया’

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात पार पडणाऱ्या आगामी टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी हा महामुकाबला पार पडेल.

आधी तोरा मिरवला पण शेवटी वठणीवर आले, पाकड्यांच्या जर्सीवर आता सन्मानाने दिसतोय 'इंडिया'
पाकिस्तानची विश्वचषकासाठीची जर्सी आधी आणि नंतर
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 9:54 PM
Share

मुंबई : आगामी टी-20 विश्वचषकाकडे (ICC T20 World Cup) संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिले आहे. आयसीसीने (ICC) सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वीच भारतीय संघही जाहीर केला. दरम्यान या स्पर्धेत सर्वांत मोठं आकर्षण म्हटलं तर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs pakistan) यांच्यात होणारा सामना हेच आहे. अगदी फायनलच्या सामन्यापेक्षा अधिक क्रेज या सामन्याचं आहे. पण या सामन्यापूर्वीच भारत आणि पाकिस्तान यांच्यात वेगळ्याच प्रकारचं शितयुद्ध सुरु झालं होतं. ज्यात अखेर भारताचाच विजय झाला आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आपआपसांतील संबधामुळे एकेमेकांचे दौरे करत नसल्याने केवळ विश्वचषक, आशिया कप, चॅम्पियन्स ट्रॉफी अशा मोठ्या स्पर्धांतच ते एकमेकांशी भिडतात. दरम्यान यंदाची विश्वचषक स्पर्धा ही कोरोनाच्या संकटामुळे भारताऐवजी युएईत होत आहे. पण यजमानपद भारताचच असल्याने सर्व संघाच्या जर्सीवर होस्ट म्हणून टीम इंडियाचच नाव आहे. पण असं असतानाही पाकिस्तानने त्यांची चिडकी वृत्ती न सोडत वर्ल्ड कपच्या जर्सीवर यजमान असणाऱ्या भारताच्या (India 2021) जागी सामने पार पडणार असलेल्या युएईचं (UAE 2021) नाव लिहिलं होतं. पण बीसीसीआयने (BCCI) यावर हरकत घेताच अखेर पाकिस्तानला माघार घेत  नवी जर्सी छापून त्यावर टीम इंडियाचं नाव छापावं लागलं आहे. याआधी पाकिस्तानने जर्सीवर इंडियाच नाव छापलं नसताना अनेक नेटकऱ्यांनी याबाबत ट्विट केलं होते.

आता मात्र पाकिस्तान संघाने नवी जर्सी छापत त्यावर सन्मानाने टीम इंडियाचं नाव लिहिलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या जर्सीचे फोटोही त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन ट्विट केले आहेत.

2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने

टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

हे ही वाचा

T20 World Cup 2021 मध्ये पाकिस्तानची पहिली लढत भारताशी, सामन्याच्या काही दिवस आधीच संघाला मोठा झटका

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मॅक्सवेलची गर्लफ्रेंड भारतीय वंशाची, लवकरच लग्नबंधनात अडकणार, पाहा PHOTO

पंचांच्या निर्णयाआधीच पव्हेलियनकडे परतणारी पूनम राऊत म्हणते, ‘हा खेळ आहे, युद्ध नाही’

(Pakistan Cricket team finally printed indias name on World cup jersey as host)

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.