T20 World cup मध्येही चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे भारत पराभूत होणार, माजी पाकिस्तानी खेळाडूचा दावा

आधी भारतात होणारा टी-20 विश्वचषक आता कोरोनाच्या संकटामुळे युएईमध्ये होणार आहे. 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे.

T20 World cup मध्येही चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे भारत पराभूत होणार, माजी पाकिस्तानी खेळाडूचा दावा
भारत विरुद्ध पाकिस्तान
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 9:16 PM

दुबई : आगामी आयसीसी टी-20 विश्व चषकासाठी (T 20 World Cup 2021) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघाची (Team India for WC) घोषणा काही दिवसांपूर्वीच केली. त्यानंतर इतर सर्व देशांनीही आपआपले संघ जाहीर केले आहे. स्पर्धेचं वेळापत्रकही समोर आलं असून आता या जागतिक स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

त्यातच संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठीही सर्वजण सज्ज झाले आहेत. दोन्ही संघ एकाच गटात असल्यामुळे 24 ऑक्टोबर, 2021 रोजी ही लढत साऱ्यांना अनुभवता येणार आहे. दरम्यान या सामन्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुदस्सर नजर याने पाकिस्तान संघाला विराट कोहली नाही तर रोहित शर्माच्या खेळापासून सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलं आहे. त्याने असं सांगत पाकिस्तान संघाला रोहित विरुद्ध चांगली रणनीती आखण्याबाबत सूचितही केलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलप्रमाणे निघेल निर्णय

मुदस्सर याने एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भारत विरुद्ध पाकिस्तान या विश्वचषकातील सामन्याबाबत भविष्यवाणी केली. भारत 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल ज्याप्रमाणे पराभूत झाला तसाच विश्वचषकताही होईल असा दावा त्याने केला आहे. तो म्हणाला, ”जर ताकदीचा विचार केला. तर भारत अधिक ताकदवर आहे. पण ज्याप्रमाणे 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आधी पाकिस्तान पराभूत झाला होता. पण अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानने नमवलं. त्याच लयीत पाकिस्तान असल्याने विश्वचषकातही भारताला नमवेल.”   

टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ – 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

या ठिकाणी रंगणार विश्वचषकाचे सामने

आधी भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे आता युएई आणि ओमान देशांत खेळवला जाणार आहे. काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय़ आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला होता. दरम्यान युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने  दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी खेळवले जाणार आहेत.

हे ही वाचा

IPL 2021: दिल्लीच्या आवेश खानचं दमदार प्रदर्शन, यॉर्कर टाकण्यात तरबेज, ‘बॉटल आणि शूज’ आहेत यामागील कारण

IPL 2021: हर्षल ठरतोय यंदाच्या हंगामातील सर्वात घातक गोलंदाज, आता सर्वोत्कृष्ट रेकॉर्डवर नजर

IPL 2021: मुंबई इंडियन्स संघात बदल, अर्जुन तेंडुलकर स्पर्धेबाहेर, नव्या खेळाडूला संधी, ‘हे’ आहे कारण

(Pakistan will beat india in t20 worldcup like 2017 champions trophy says mudassar nazar)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.